जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड, घसघशीत पॅकेज
एका पाठोपाठ एक नोकरीसाठी निवड होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ; महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचा उपक्रम
डेल्टा
एक्स सोल्युशन्स पुणे/बंगलोर, ईगलबाइट सोल्युशन्स प्रा.
लिमिटेड नाशिक, अकॅदेमोर एज्युटेक बेंगळुरू, टेस्ट यंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्स बेंगळुरू, पीएबी
लर्न लीड अँड ग्रो प्रायव्हेट लिमिटेड इंदूर, अपग्रेड
एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या विविध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयामधील कल्पेश मराठे,
प्रज्वल वाकुळकर, गणेश सुपारे, रिया जैन, स्नेहा चोपडे, हरीश
चव्हाण, चेतन पाटील, निशांत बडगुजर,
यशराज पाटील, भाग्यश्री पाटील, प्रणव पवार, अथर्व वंजारी, ईश्वरी
नेमाडे, प्रिती साहा या विद्यार्थ्यांची वैयेक्तिक मुलाखती
घेवून निवड केली.
विविध
आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर
घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा सखोल
अभ्यास करून औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार स्कील बेस्ड कोर्स व प्रॅक्टिकल
ट्रेनीग वर फोकस करण्यात येत आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार मेजर- मायनर हि
सिस्टीम राबवत दोन डोमेनमध्ये यशस्वी करिअरसाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक
तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय पद्धतींत शिक्षित करणे. माहिती विज्ञान, उद्योग आणि अभियांत्रिकीशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण व
संशोधन वृत्ती निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे तसेच विध्यार्थ्यांना विशेष
प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी यावेळी दिली. सदर विद्यार्थ्यांना अकॅडमिक
डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ.
गिरीधारी तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी
इस्टीट्यूटच्या अध्यक्ष श्री. सुनीलजी
रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले़.
Comments
Post a Comment