आयआयटीत संशोधनासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान

जळगाव, ता. १७  : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील प्रा. प्रियंका बरडे यांना आयआयटी चेन्नई व याच विभागातील प्रा. पल्लवी सुरवाडे यांना आयआयटी खरगपूर येथील प्रतिष्ठित अशी “समर रिसर्च फेलोशिप” नुकतीच प्रदान करण्यात आली.

देशभरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे सुमारे २० हजार विद्यार्थी प्रकल्प सादर करतात. त्यातून त्यांची या फेलोशिपसाठी निवड करण्यात येते. निवड झालेल्या प्राध्यापकांना निवड झालेल्या ठिकाणी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाते. प्रा. प्रियंका बरडे व प्रा. पल्लवी सुरवाडे हे मेडिकल इमेजिंग व बिग डेटा या विषयावर संशोधन करणार आहे. ही फेलोशिप मिळाल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश