जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे

विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे सादरीकरण ; प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी केले मार्गदर्शन जळगाव , ता. ३१ : येथील जी.एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयात “ उमंग-२०२४ ” या शीर्षकाखाली सुरु झालेले दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे व प्रा. करिष्मा चौधरी यांनी फीत कापून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी नमूद केले कि , महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभांसह कलागुणांना वाव मिळत असुन त्यांच्या सुप्त गुणांसह मानसिक , बौद्धिक तथा शारीरिक विकास साध्य होतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहेत. शिक्षणासोबतच कलागुणांना वाव देणाऱ्या संधी मिळाल्यास विद्यार्थी हे बौद्धिक , मानसिक व शारिरीकदृष्ट्या सुदृढ असतील तरच समाजाचा व देशाचा आधारस्तंभ होतील. विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन व संस...