१७ डिसेंबरला रंगणार “जी. एच. रायसोनी करंडक” या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी

स्पर्धेत यंदा १० महाविध्यालयाचे नाट्यप्रयोग होतील सादर ; अंतिमला १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक

जळगाव, ता. १० : जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्याअंतर्गत एकांकिका स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले असून या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय जळगाव येथे संपन्न होणार आहे.

आतापर्यंत या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, सोलापूर, अमरावती, अलिबाग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि नागपूर शाखेने सहभाग घेतला असून या सहभागी शाखेमधून प्रत्येक केंद्रातून सर्वोत्कृष्ट एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडली आहे, त्यात रत्नागिरी शाखेची लेटर बॉक्स’, पुणे शाखेची पाटीतर कोल्हापूर शाखेची व्हाय नॉटया एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच जळगाव विभागाच्या प्राथमिक फेरीत ९ महाविध्यालयाचे नाट्य संघ सहभागी होणार असून त्यात (खेळ..!) नूतन मराठा महाविध्यालय जळगांव, (रंगबावरी) दादासाहेब डॉ सुरेश जी. पाटील महाविध्यालय चोपडा, (रंगवास्तू) शासकीय अभियांत्रिकी महाविध्यालय छत्रपती संभाजी नगर, (लॉटरी) एसव्हीकेएम इस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी धुळे, (मुंग्या) केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र जळगाव, (भारतीय) झुलाल भीलाजीराव पाटील महाविध्यालय धुळे, (राम मोहम्मदसिंग आझाद) कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, (सन्माननीय षढानौ) श्री. पंडितगुरु पारडीकर महाविद्यालय शिरसाळा या विविध संघाचा समावेश असून ते ता. १७ डिसेंबर रोजीच्या जळगाव विभागाच्या प्राथमिक फेरीत एकांकिका सादर करणार आहे.

तसेच अंतिम फेरी १,,३ व ४ फेब्रुवारी २०२५ ला नागपूर येथे होणार असून अंतिम फेरीत १ लाख ११ हजार रुपये प्रथम, ७१ हजार रुपये द्वितीय, ५१ हजार रुपये तृतीय तर २१ हजार उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय संघाना पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय व्यक्तिगत व उत्तेजनार्थ पुरस्कारही दिले जातील. सदर स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी व सर्व सहभागी विध्यार्थ्यानी उपस्थित रहावे असे आवाहन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी करंडकच्या मुख्य समन्वयिका मृणाल नाईक व टीम यांच्या वतीने करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश