“जी. एच. रायसोनी करंडक” एकांकिका स्पर्धेत नूतन मराठा महाविध्यालयाची “खेळ” प्रथम
१ ते ४ फेब्रुवारीला नागपूर येथे अंतिम फेरीचे आयोजन ; महाराष्ट्रातील ६९ आंतरमहाविद्यालयीन नाट्य संघ सहभागी
जळगाव, ता. १८ : महाविद्यालयीन युवक-युवतींनी उत्साहाने सहभाग नोंदवलेल्या जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “जी.एच. रायसोनी करंडक” या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयालय, जळगाव या केंद्रावर ता. १७ मंगळवार रोजी झालेल्या प्राथमिक फेरीत नूतन मराठा महाविद्यालयाच्या ‘खेळ’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला तसेच डॉ. सुरेश जी. पाटील महाविध्यालय चोपडा यांची "रंगबावरी" द्वितीय व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या "राम मोहम्मदसिंग आझाद" या एकांकिकेला तृतीय पारितोषिक देण्यात आले तसेच परीक्षक प्रशंसनीय पुरस्काराने श्री. पंडितगुरु पारडीकर महाविद्यालय शिरसाळा, बीड यांनी सादर केलेल्या "सन्माननीय षंडानो" या एकांकिकेला गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन जी. एच. रायसोनी
इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ.
संजय शेखावत, स्पर्धेचे
परीक्षक प्रा. राजेंद्र देशमुख व नाट्यकर्मी मंजुषा भिडे या उपस्थित होत्या.
यावेळी नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन घंटानाद करून करण्यात
आले.
स्पर्धेचे प्रास्ताविक करतांना
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, विध्यार्थी कलावंताच्या नाट्य
कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून “जी. एच. रायसोनी करंडक” हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवीत असून
नाटकामुळे विध्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास, कल्पनाशक्ती, सुसंवाद असे अनेक गुण वाढीस लागतात व
त्यांना त्याचा भविष्यात फायदा होत असल्याचे म्हणत त्यांनी सहभागी विध्यार्थ्यांच्या
सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.
दिवसभर सुरु असलेल्या या स्पर्धेत
जळगाव, धुळे, संभाजीनगर व बीड येथील अनेक
महाविद्यालयांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी नूतन मराठा महाविद्यालय जळगाव, डॉ. सुरेश जी. पाटील महाविध्यालय चोपडा, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील
नाट्यशास्त्र विभाग व श्री. पंडितगुरु पारडीकर महाविद्यालय शिरसाळा, बीड या चार संघाच्या एकांकिकांची
विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. नागपूर येथील नियोजित नाटय़गृहात येत्या १,२,३ व ४ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी
रंगणार आहे. यात विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रुपये प्रथम, ७१ हजार रुपये द्वितीय, ५१ हजार रुपये तृतीय तर २१ हजार
उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय संघाना पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय व्यक्तिगत
पुरस्कारही दिले जातील.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण
कार्यक्रमात बोलतांना परीक्षक प्रा. राजेंद्र देशमुख म्हणाले की, युवक विध्यार्थ्यानी या स्पर्धेत
सहभागी होऊन सर्वांनी दर्जेदार कला सादर केली. रसिकांना मनमुराद आनंद दिला. यातून
तुम्ही सर्वजण विजयी ठरले आहात. स्पर्धेत सादर झालेल्या दर्जेदार नाट्य कृतींसाठी
बॅकस्टेज आर्टीस्टसह सर्व कलावंताचे त्यांनी विशेष कौतुक केले. उत्कृष्ट
नियोजनाबाबत जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. यानंतर
महाविध्यालयाकडून आभार प्रदर्शनात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी ‘जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल
फाउंडेशन’ने
या स्पध्रेद्वारे युवा कलाकारांना फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा
त्यांनी डोळसपणे उपयोग करून घेतला असे मत नोंदवत पुढील वर्षी अधिक संख्येने सहभागी
होण्याचे आवाहन केले. या स्पर्धेचे समन्वय जी.एच. रायसोनी करंडकच्या मुख्य
समन्वयिका मृणाल नाईक व रायसोनी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील
यांनी साधले. तर सदर नाट्य स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी
इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment