जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे
विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे सादरीकरण ; प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी केले मार्गदर्शन
जळगाव, ता. ३१ : येथील जी.एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयात “उमंग-२०२४” या शीर्षकाखाली सुरु झालेले दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे व प्रा. करिष्मा चौधरी यांनी फीत कापून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी नमूद केले कि, महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभांसह कलागुणांना वाव मिळत असुन त्यांच्या सुप्त गुणांसह मानसिक, बौद्धिक तथा शारीरिक विकास साध्य होतो. आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य आहेत. शिक्षणासोबतच कलागुणांना वाव देणाऱ्या संधी मिळाल्यास विद्यार्थी हे बौद्धिक, मानसिक व शारिरीकदृष्ट्या सुदृढ असतील तरच समाजाचा व देशाचा आधारस्तंभ होतील. विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक घड़विने हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. असे म्हणत त्यांनी या स्नेह संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमाची माहिती दिली तसेच विध्यार्थ्यांना यावेळी विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर प्रा. कल्याणी नेवे यांनी म्हटले कि, स्नेहसंमेलनाचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे हा असतो. स्नेहसंमेलनात संस्कृती व ऐतिहासिक कार्यक्रमाची झलक सादर होत असल्याने त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. ता.३० व ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये नृत्य, गीत गायन, डिपार्टमेंट वॉर, पर्सनालिटी कॉन्स्टट, डे सेलिब्रेशन व फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विध्यार्थ्यानी मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, अशी विविध बहारदार गीते विध्यार्थी स्पर्धकांनी सादर केली तसेच प्रेक्षक विद्यार्थ्यांनी विविध गीतांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी स्नेहसंमेलनासाठी प्रा. निकिता वालेचा, प्रा. प्रियंका मल, प्रा. शीतल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. राहुल यादव, प्रा. अभिषेक सुरेया, अनिल सोनार, संतोष मिसाळ यांनी समन्वयकाची भूमिका बजावली तर परीक्षक म्हणून प्रा.नैना चौधरी व प्रा. मीनाक्षी पाटील यांनी काम पाहिले. तसेच फैझल शेख व युसरा मीर या विध्यार्थ्यानी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment