जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात !

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण ; जिल्हा परिषदचे सीईओ श्री. अंकित व जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव, ता. २३ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी, सौ. पलक रायसोनी तसेच सल्लागार श्री. प्रेमदादा रायसोनी, श्री. महेंद्र रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, श्री. नितीन रायसोनी, सौ.भारती रायसोनी व सौ. ज्योत्स्ना रायसोनी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करून, विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत व गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपले मत व्यक्त करतांना पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी म्हणाले की रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते आणि नाटिकेतून सर्व धर्म समभाव हा एक मौलिक संदेश मिळाला तसेच देशभक्तीपर विचारांची जनजागृती तसेच देशाचा इतिहास व भारतीय संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलाकृतींमधुन घडविले हे या कार्यक्रमाचे विशेष. तसेच ही शाळा हे सर्व संस्कार विद्यार्थ्यांवर पेरत असल्याचा सार्थ अभिमान वाटतोअसे म्हणुन त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व स्कूलच्या व्यवस्थापन मंडळाचे कौतुक केले.

हा कार्यक्रम मुख्यतः स्वर्ग व पृथ्वी यातील आठवणींचे क्षणया संकल्पनेवर आधारित असल्याने संपूर्ण स्नेहसंमेलनात या विषयांवर कलाविष्कार सादर करण्यात आले. तसेच उत्कर्ष पाटील व कार्तिक हिरे या विद्यार्थ्यांनी चित्रगुप्त व नारद यांची भूमिका साकारून ऐतिहासिक व सामाजिक प्रश्न नाटिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी शाळेचा कला, शैक्षणिक, क्रीडा व सर्वांगीण विकासातील गुणवत्ता वाढीचा उंचावत चाललेला आलेख मांडला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांसह आई-वडिलांचा सन्मान व आदर बाळगण्याचे आवाहन करुन उत्कृष्ट व नियोजनबध्दपणे सादरीकरण केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत वार्षिक अहवाल वाचन करतांना वर्षभरातील स्पर्धा, कार्यक्रम सण, उत्सव यांचा संख्यात्मक व गुणात्मक विकास, गुणवंत शिक्षक, विद्यार्थी यांच्या कार्याचा लेखा जोखा मांडला व आलेल्या मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. स्नेहसंमेलनाच्या शेवटाला चित्रपट गायक सुशीन श्याम व डेबजी यांनी गायलेल्या इल्लू मीना टीया गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश