जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील २३ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड, घसघशीत पॅकेज

महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचा उपक्रम ;  संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केला सत्कार

जळगाव, ता. १२  : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विविध विद्या शाखांमधील विद्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असते. याच अनुषंगाने विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनींनी घेतलेल्या मुलाखतीत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे २३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.

औरंगाबाद येथील बीजी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापक अनुज शर्मा, पुणे येथील एव्हर इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड रिक्रूटमेंट प्रमुख दिप्तेश दीक्षित व औरंगाबाद एक्सेल प्लेसमेंटचे संचालक सतीश कुबेर हे यावेळी निवडकर्ते म्हणून उपस्थित होते. या निवड समितीने जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयामधील पूजा कमलाकर पाटील, रोहित विलास हलदे, मोहित देविदास पाटील, सेजल संजीव पाटील, धनश्री पंडित पाटील, सानिका दिनेश पवार, श्रुती विजय वानखेडे, विकास संजय शेतखर, गीता पी बडगुजर, सौरभ गजानन आगाव, हरेश दीपक नेरकर, धीरज लक्ष्मण पाटील, श्रेयस मनोज बाविस्कर, जयेश संजय तायडे, ओम अनिल इंगळे, सुरज वानखेडे, सोपान गोकुळ चव्हाण, शितल नथू महाजन, शेख मोहम्मद, सलोनी आनंद सूर्यवंशी, चिरायू ज्ञानेश्वर बागुल व धीरज संजय भोई या विद्यार्थ्यांची वैयेक्तिक मुलाखती घेवून निवड केली.

विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ?  याचा सखोल अभ्यास करून औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार स्कील बेस्ड कोर्स व प्रॅक्टिकल ट्रेनीग वर फोकस करण्यात येत आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार मेजर- मायनर हि सिस्टीम राबवत दोन डोमेनमध्ये यशस्वी करिअरसाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय पद्धतींत शिक्षित करणे. माहिती विज्ञान, उद्योग आणि अभियांत्रिकीशी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण व संशोधन वृत्ती निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे तसेच विध्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे अशी माहिती संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी दिली. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. गिरीधारी तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जी. एच.  रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले़.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश