Posts

Showing posts from September, 2024

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील “एमबीए”च्या विद्यार्थ्यांचा स्टार अँग्रो कंपनीला अभ्यासदौरा

Image
या औद्योगीक दौऱ्यात विध्यार्थ्यानी जाणून घेतली स्टार अँग्रो इंडस्ट्रीजच्या कामकाजाची माहिती ; विध्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग जळगाव , ता. २४ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जळगाव शहरालगत असलेल्या “ स्टार अँग्रो कंपनी ” येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल कशा पद्धतीने तयार केला जातो. त्याची साठवणूक , हिशोब पद्धती , वितरण पद्धती , अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया , ऑटोमेशन , निर्यात , वित्त आणि एचआर या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते असे संचालिका प्रा. डॉ. प्...

सेपक टकरा स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय “अजिंक्य”

Image
कौतुकास्पद ! जळगाव जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या संघांला विजेतेपद जळगाव, ता. २३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे , तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यामार्फत झालेल्या 19 वर्षा आतील जिल्हास्तरीय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेत जी एच रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय संघाने अप्रतिम खेळी करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये सृष्टी पाटील हिने इकरा पब्लिक स्कूल संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळ करत रायसोनी संघास एकतर्फी विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातून अनेक संघांनी सहभाग घेतला होता. या खेळात जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय संघाकडून केतकी युवराज महाजन, समीक्षा रवींद्र छाडेकर, सृष्टी छोटू पाटील, पूजा शैलेश पाटील, गायत्री उमेश पाटील यांनी सहभाग नोंदविला. इकरा पब्लिक स्कूल संघासमोर खेळी करताना १५-११ हा एकतर्फी विजय अंतिम सामन्यात मिळवला. सेपक टकरा स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळांडूनी केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे स्पर्धेत महाविद...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत काम ; गणपतीचे निर्माल्य संकलन करून विघटन

Image
मेहरूण तलाव येथील गणपती विसर्जनस्थळी राबविला स्तुत्य उपक्रम ; विध्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक जळगाव, ता. २१ :  जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट क्लब व राष्ट्रीय सेवा योजनाच्या विध्यार्थ्यातर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य संकलन व विघटन ’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले. गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेले फुले, दुर्वा, फुलांचे हार पाण्यात टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळून या उपक्रमामुळे निर्माल्याचे योग्य पद्धतीने विघटन करून पावित्र्य राखले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक हे, बरोबर आणलेली व पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्या, कापूर सोबत आणून विसर्...

जगाच्या विकासकार्यात अभियंत्यांचे मोठे योगदान : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा   ; टॉय   मेकिंग   स्पर्धेचे आयोजन जळगाव ,  ता. १९ : तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाल्याने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र क्रांती होत असून अभियांत्रिकी आणि डिजिटल टेक च्या प्रगतीमुळे भारत लवकरच महासत्तेकडे आगेकूच करत आहे. विकसित भारताचे स्वप्न अभियंत्यांनी केलेल्या नवनवीन संशोधनामुळेच शक्य होणार आहे तसेच उद्योजकता व स्टार्टअप वाढीसाठी चालना देणे गरजेचे असल्याचे मत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियंता दिन या कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केला. प्रसिद्ध अभियंते व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या अनुषगाने ता. १५ रोजी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अ‍ॅकडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत ,  संगणकशास्त्र , ...

नातवांच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबांची धम्माल

Image
आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद , खेळ व गप्पा गोष्टी तसेच “ भव्य फूड फेस्टिवल ” चे आयोजन करत आजी-आजोबा दिवस साजरा ! जळगाव , ता. १७ : सावखेडा परिसरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आजी-आजोबांचा दिवस म्हणून “ एक दिवस स्वतःसाठी लहान होऊन जगण्यासाठी ” या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम आजी आजोबांचे स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांनी आपल्या आजी आजोबांचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रमातून केले तसेच आजी आजोबांना ग्रीटिंग कार्ड्स देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले. आपल्या नातवंडाचे कौतुक बघून आजी-आजोबा गहिवरले. आजी-आजोबा व नातवंडाविषयी बऱ्याच आजोबा आजींनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणवले ‘ हा ’ सोहळा खूपच हृदयस्पर्शी झाला. यावेळी “ भव्य फूड फेस्टिवल ” चे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पक्वान्न बनवत पाककलेच्या गुणांचे दर्शन घडविले. चटपटीत आणि खमंगदार सुहास आणि चवीने उपस्थित आजी आजोबांनी भरभरून कौतुक केले या उपक्रमावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील “गणरायाला” भव्य मिरवणुकीने निरोप

Image
श्रद्धा इंडस्ट्रीचे संचालक श्री. महेंद्र रायसोनी याच्या हस्ते सपत्नीक श्री. गणेशाची आरती ; विध्यार्थ्यांच्या ढोलपथकाने परिसर गजबजला जळगाव , ता. १३ : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात असंख्य विध्यार्थी भक्तांच्या उपस्थितीत रंगीबेरंगी फुलांनी , विद्युत रोषणाईने सजलेल्या रथातून जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या गणरायाला सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अभियांत्रिकी इमारतीच्या परिसरात सात दिवसापूर्वी गणरायाची भक्तिभावात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या स्थळी रोज गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटचे विश्वस्त व श्रद्धा इंडस्ट्रीचे संचालक श्री. महेंद्र रायसोनी त्यांच्या पत्नी सौ. ज्योत्स्ना रायसोनी , जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , जी. एच. रायसोनी कनिष्ट महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी , प्राध्यापक , प्रध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्याच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बाप्पाच्या ...

“जी. एच. रायसोनी करंडक” या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बिगुल वाजला : २४ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची अट

Image
१० ऑक्टोबरला जळगावात रंगणार प्राथमिक फेरी ; १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक जळगाव , ता. ११ : जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे १० ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आली आहे. शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होईल. तालीम पद्धतीने प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नेपथ्य , वेशभूषा , रंगभूषेचा वापर अनिवार्य नसेल. तसेच यावेळी लाईट्स आणि लेव्हल्सही पुरविण्यात येणार नाही. ही फेरी पूर्णपणे तालीम स्वरुपात होणार आहे. स्पर्धक संघांनी संहितेच्या दोन प्रती आणि डीआरएमची पावती प्राथमिक फेरीतील प्रयोगापूर्वीच द्यायचे आहे. स्पर्धक संघाने एक तास आधी केंद्रावर रिपोर्टींग करणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा पूर्णपणे मराठी भाषेतील एकांकिकांसाठी आहे. जे कलावंत प्राथमिक फेरीत काम करतील तेच कलावंत अंतिम फेरीतही असणे अनिवार्य आहे. ऐनवेळी कलावंत बदलता येणार नाही तसेच प्राथमिक फेरीत सहभा...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” स्पर्धेचे आयोजन

Image
यावर्षी देखील “ प्रथम ” येण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निश्चय ; महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धेची निवड फेरी आयोजित जळगाव , ता. ९ : “ स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ” साठी अंतर्गत हॅकेथॉन ही प्राथमिक फेरी म्हणून सर्वोत्कृष्ट ३० संघ निवडण्यासाठी आणि नामांकित करण्यासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘ स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ’ स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल यांच्या सहाय्याने नवनवीन कल्पना व नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या महाविध्यालय अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धेची प्राथमिक फेरी असल्याने सुमारे ३० प्रकल्पांची पुढील फेरीसाठी निवड झाली आहे.   यावेळी स्पर्धेच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील व स्पर्धेचे परीक्षक उमेश सेठिया , अजिंक्य तोतला , अमित भामरे , चेतन गिरनारे , मनोज कुमावत , केदार काबरा यांनी दीपप्रज्वलन करून ...

जी. एच रायसोनी महाविध्यालयात “बिजनेस मेला”च्या माध्यमातून तरुणाईने गिरवले व्यवस्थापनाचे धडे

Image
खाऊचे स्टॉल ते लाकडापासून तयार केलेल्या कलाकृतीपर्यंत विविध ३१ स्टॉल लावत असंख्य विध्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग जळगाव , ता. ६ : उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजार लावून अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम “ बिजनेस मेला ” तून प्राप्त व्हावे या हेतूने जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “ बिजनेस मेला ” म्हणजेच कॅम्पस बाजार भरवून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या प्रदर्शनात खाऊच्या स्टॉलपासून लाकडापासून तयार केलेल्या कलाकृतीपर्यंत विविध ३१ स्टॉल होते. त्यात जेवणाचे पदार्थ , सॅडविच , नव्या पद्धतीचे सरबत , ग्रिटिंग्ज , पुस्तके , आयटी , काष्ठशिल्प अशी अनेक दालने होती. महाविद्यालयीन युवक-युवतींबरोबर प्राध्यापक तसेच विध्यार्थ्यांच्या पालकांनी या बिजनेस मेळाव्याला भेटीं दिल्या. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात येत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी अकॅडमिक डीन प्...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात "अकाउंटींग म्युझियम ऑफ इंडिया" स्थापन

Image
महाविद्यालयातील ४४ फुटी वॉलवर उलगडणार अकाउंटन्सीचा प्रवास ; वैदिक काळापासून ते आतापर्यंतचा लेखाजोखा     जळगाव , ता. २ : हिशोबाच्या पुस्तकांचे जग हे अनोखे आहे. ही पद्धत वैदिक काळापासून प्रचलित आहे. अकाउंटींगशी जुड्नार्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांना त्यातील इतिहास व बदलांची जाणीव करून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच "अकाउंटींग म्युझियम ऑफ इंडिया" जळगाव शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उभारले गेले असून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार २ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या म्युझियमचे उद्घाटन झाले. या म्युझियममध्ये वैदिक काळ , मुघल काळ , ब्रिटीश राजवट आणि आजच्या काळातील लेखाजोखा वेगवेगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि , या संग्रहालयाला केवळ विध्यार्थीच नव्हे तर शहरातील रहिवासीही भेट देऊ शकतात. अकाउंटींगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठ...