जी. एच रायसोनी महाविध्यालयात “बिजनेस मेला”च्या माध्यमातून तरुणाईने गिरवले व्यवस्थापनाचे धडे
खाऊचे स्टॉल ते लाकडापासून तयार केलेल्या कलाकृतीपर्यंत विविध ३१ स्टॉल लावत असंख्य विध्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग
जळगाव, ता. ६ : उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजार लावून अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम “बिजनेस मेला”तून प्राप्त व्हावे या हेतूने जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात “बिजनेस मेला” म्हणजेच कॅम्पस बाजार भरवून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या प्रदर्शनात खाऊच्या स्टॉलपासून लाकडापासून तयार केलेल्या कलाकृतीपर्यंत विविध ३१ स्टॉल होते. त्यात जेवणाचे पदार्थ, सॅडविच, नव्या पद्धतीचे सरबत, ग्रिटिंग्ज, पुस्तके, आयटी, काष्ठशिल्प अशी अनेक दालने होती. महाविद्यालयीन युवक-युवतींबरोबर प्राध्यापक तसेच विध्यार्थ्यांच्या पालकांनी या बिजनेस मेळाव्याला भेटीं दिल्या. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्यात येत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, व अन्य प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, मुख्यतः “बिजनेस मॅनेजमेट” हा विषय वर्गात थेरी शिकवण्याबरोबरच बाहेरच्या वातावरणात जात तेथील विविध प्रात्यक्षिक ज्ञान घेणारा विषय आहे. “बिजनेस मेला”या उपक्रमातून विध्यार्थी “लर्निग बाय सेलिंग” शिकतात म्हणजेच कि विध्यार्थ्यांना यातून नेतृत्व, टीमवर्क, टार्गेट सेट, नेट्वर्किंग, अर्थशास्त्र, अकाउंट, नियोजन, डीसीजन मेकिंग, इनोव्हेशन यासारखे विविध विषय शिकता येतात तसेच व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेत, ग्राहकांच्या गरजांची जाणीव त्यांनी समजून घ्यावी, वस्तूचे महत्व जाणून बाजारात उतरावे, तसेच आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, या गुणांसह व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असून प्रत्यक्ष विक्रीचे अनुभव मिळावेत या उद्देशाने “बिजनेस मेला” हा उपक्रम राबविण्यात आल्याचे संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले. तसेच या उपक्रमात सहभागी विध्यार्थ्यानी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले कि, आम्हाला आम्ही तयार केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग करण्याचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झाले. या कॅम्पस बाजारमूळे आमचा आत्मविश्वासही वाढला तसेच या उपक्रमाच्या प्रदर्शनाचे आयोजन कसे करावे, त्यासाठी पूर्वतयारी कशी करावी, कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, विक्री वाढवण्यासाठी कशाची मदत होऊ शकते अशा अनेक गोष्टी तरुणाईला या प्रदर्शनातून शिकता आल्या असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. विशाल सुनील राणा, प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. श्रेया कोगटा यांनी साधले तसेच या उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment