जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” स्पर्धेचे आयोजन

यावर्षी देखील प्रथमयेण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निश्चय ; महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धेची निवड फेरी आयोजित

जळगाव, ता. ९ : स्मार्ट इंडिया हॅकेथॉनसाठी अंतर्गत हॅकेथॉन ही प्राथमिक फेरी म्हणून सर्वोत्कृष्ट ३० संघ निवडण्यासाठी आणि नामांकित करण्यासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल यांच्या सहाय्याने नवनवीन कल्पना व नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या महाविध्यालय अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धेची प्राथमिक फेरी असल्याने सुमारे ३० प्रकल्पांची पुढील फेरीसाठी निवड झाली आहे.  

यावेळी स्पर्धेच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील व स्पर्धेचे परीक्षक उमेश सेठिया, अजिंक्य तोतला, अमित भामरे, चेतन गिरनारे, मनोज कुमावत, केदार काबरा यांनी दीपप्रज्वलन करून या स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत म्हटले कि, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक व्यासपीठ असून मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही स्पर्धा रायसोनी इस्टीट्युट येथे घेतली जात आहे. शासनाला येणाऱ्या विविध स्थानिक समस्या या स्पर्धेत विध्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात. तसेच मला नमूद करावेसे वाटते कि, मागील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२२मधील स्पर्धेच्या अंतिम फेरीत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. आणि या स्पर्धेत अनेक प्रकल्पांना मागे टाकत आमच्या जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्याच्या दोघही संघांनी प्रत्येकी एक-एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिक मिळवत राष्ट्रीय स्तरावर व देशात प्रथम क्रमांक मिळवून रायसोनी महाविद्यालयाचा ठसा उमटवला. याच प्रकारचा विश्वास आम्हाला यावर्षी देखील असून त्याच ताकदीने आमचे विध्यार्थी यावर्षी देखील प्रयत्न करतांना दिसणार आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मागील काही वर्षांपासून हॅकेथॉनस्पर्धा आयोजित केली जात आहे. जे विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्यांना इतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून धडे मिळत आहेत. त्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याने या विद्यार्थ्यांसाठी अनेक ठिकाणी नोकरीची संधी निर्माण होत असल्याचे डॉ. शेखावत यांनी सांगितले. यानंतर संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होत असून आपल्या नवकल्पनांचा, आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहे. जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल. तसेच तंत्रज्ञानासंबंधित येणाऱ्या विविध समस्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून न राहता आपल्याच देशात सर्व समस्याचे निराकरण झाले पाहिजे हा या स्पर्धेचा उद्धेश असून शासनाला येणाऱ्या विविध स्थानिक समस्याही या स्पर्धेत विध्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात अशी माहिती त्यांनी यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना दिली. महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ४०० हून अधिक विधार्थ्यानी सहभाग नोंदविला. तसेच स्पर्धेतील ६६ पैकी ३० संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून ते राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम फेरीत आपली चमक दाखविणार आहे. या स्पर्धेसाठी प्रा. डॉ. स्वाती पाटील, डॉ. निलेश इंगळे, डॉ. चेतन चौधरी, प्रा. धनेश पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले. 


राष्ट्रीय स्पर्धेचं थोडक्यात स्वरूप

देशात, विशेषतः तरुणांमध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याचा प्रधानमंत्र्यांचा सातत्यानं प्रयत्न असून त्या दृष्टीनं २०१७ साली स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा सुरु करण्यात आल्या. समाज, संस्था आणि सरकारच्या गंभीर समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा देशव्यापी उपक्रम आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे जगातलं नाविन्यतेचं सर्वात मोठं व्यासपीठ असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्पादनाचं नावीन्य, समस्यांचं निराकरण आणि आगळ्या वेगळ्या विचारांची संस्कृती रुजवणं हा यामागचा उद्देश आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारत सरकारचे कृषी, शिक्षा, पर्यटन, वस्रोद्योग,वाणिज्य आणि उदयोग, संरक्षण, वित्त, आरोग्य व कुटुंब कल्याण,गृह, माहिती आणि प्रसारण हे विविध मंत्रालय देशपातळीवर  त्याच्या विविध समस्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या पोर्टलवर प्रदर्शित करून विध्यार्थ्यांना त्यावर उपाय शोधायला सांगतात, त्यावर भारतातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थी क्रियेटीव्ह, टिकाऊ व सामाजिक सलोख्याच्या आयडिया शोधून स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करतात तसेच ही स्पर्धा ३० तासांची कम्प्युटर प्रोग्रॅमिंग स्पर्धा असून दरवर्षी या स्पर्धेसाठी देशभरातून विकासक आणि प्रोग्रॅमर यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात येते. या स्पर्धेत वेळेची मर्यादा असल्यामुळे बरेच विद्यार्थी संघ रात्रंदिवस काम करतात. यामुळे हॅकेथॉन सहभागींना एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि विविध प्रकारच्या नवकल्पनांबद्दल विचार करण्यास भाग पडते. तसेच आयडिया सबमिशन काउंटर ऑगस्ट 2023 पासून सुरू झाले असून केवळ 500 आयडिया स्वीकारल्या जातील. आयडिया सबमिशन प्रक्रियेनंतर, तज्ञांकडून कल्पनांचे मूल्यमापन केले जाते त्यात आयडियाची नवीनता, जटिलता, स्पष्टता विहित नमुन्यातील तपशील, टिकाऊपणा, प्रभावाचे प्रमाण, वापरकर्ता अनुभव आणि भविष्यातील कामाच्या प्रगतीची क्षमता यात तपासले जाते व यानंतर एका प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये सुमारे 4 ते 5 संघांची भव्य अंतिम फेरीत स्पर्धा करण्यासाठी निवड केली जाते. 

 

संघ निर्मिती

१) सर्व संघ सदस्य एकाच महाविद्यालयातील असावेत; कोणत्याही आंतर-महाविद्यालयीन संघांना परवानगी नाही. किंवा एकाच कॉलेज/संस्थेच्या विविध शाखांमधील सदस्यांना एक संघ तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

२) प्रत्येक संघात संघ प्रमुखासह 6 सदस्य अनिवार्य असतात.

3) प्रत्येक संघात किमान एक महिला संघ सदस्य असणे आवश्यक आहे.

४) संघाचे नाव युनिक असावे आणि त्यात तुमच्या संस्थेचे नाव कोणत्याही स्वरूपात नसावे. ५) प्रति महाविद्यालय कमाल ३५ संघ (३० शॉर्टलिस्टेड + ५ वेटलिस्टेड) नामांकित केले जाऊ शकतात.

  

राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत विध्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिकही मिळणार

जे समाजोपयोगी सोल्युशन सर्वोत्तम आणि कार्यक्षम असेल, त्यांना अनुक्रमे पुढील क्रमानुसार राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारितोषिक दिले जाईल. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 75000, तृतीय पारितोषिक 50000 असे राहतील. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश