नातवांच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबांची धम्माल
आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच “भव्य फूड फेस्टिवल” चे आयोजन करत आजी-आजोबा दिवस साजरा !
जळगाव, ता. १७ : सावखेडा
परिसरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा
करण्यात आला. आजी-आजोबांचा दिवस म्हणून “एक दिवस स्वतःसाठी लहान होऊन जगण्यासाठी” या संकल्पनेतून
अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम आजी आजोबांचे स्वागत करण्यात
आले. चिमुकल्यांनी आपल्या आजी आजोबांचे स्वागत सांस्कृतिक कार्यक्रमातून केले तसेच
आजी आजोबांना ग्रीटिंग कार्ड्स देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले.
आपल्या नातवंडाचे कौतुक बघून आजी-आजोबा
गहिवरले. आजी-आजोबा व नातवंडाविषयी बऱ्याच आजोबा आजींनी आपले मनोगत व्यक्त केले.
मनोगत व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणवले ‘हा’ सोहळा खूपच
हृदयस्पर्शी झाला. यावेळी “भव्य फूड फेस्टिवल” चे आयोजन करण्यात
आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पक्वान्न बनवत पाककलेच्या गुणांचे
दर्शन घडविले. चटपटीत आणि खमंगदार सुहास आणि चवीने उपस्थित आजी आजोबांनी भरभरून
कौतुक केले
या उपक्रमावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्यांनी
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नमूद केले कि, शालेय वयात
मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबांची महत्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी
आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध
कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय खरोखर कौतुकास्पद
आहे तसेच या उपक्रमातून संयुक्त कुटुंब संस्कृतीला प्रोत्साहन तसेच
विद्यार्थ्यांसोबत आजी-आजोबांचे नाते अधिक धृड होईल यात शंका नाही असे त्यांनी
यावेळी नमूद केले.
प्रस्तावना व स्वागत समन्वयक श्रीमती निकिता
जैन यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी मानले. जी. एच.
रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी सर्व आजीं-आजोबाना
निरोगी आयुष्य तसेच दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी सर्व
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment