सेपक टकरा स्पर्धेमध्ये जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय “अजिंक्य”
कौतुकास्पद ! जळगाव जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या संघांला विजेतेपद
जळगाव, ता. २३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यामार्फत झालेल्या 19 वर्षा आतील जिल्हास्तरीय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेत जी एच रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय संघाने अप्रतिम खेळी करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. या स्पर्धेमध्ये सृष्टी पाटील हिने इकरा पब्लिक स्कूल संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळ करत रायसोनी संघास एकतर्फी विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातून
अनेक संघांनी सहभाग घेतला होता. या खेळात जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय संघाकडून केतकी
युवराज महाजन, समीक्षा रवींद्र छाडेकर, सृष्टी छोटू पाटील, पूजा शैलेश पाटील, गायत्री
उमेश पाटील यांनी सहभाग नोंदविला. इकरा पब्लिक
स्कूल संघासमोर खेळी करताना १५-११ हा एकतर्फी विजय अंतिम सामन्यात मिळवला.
सेपक टकरा स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळांडूनी
केलेल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे
स्पर्धेत महाविद्यालयासह खेळाडू विध्यार्थिनीचे नाव उंचावले गेले. आगामी स्पर्धेत
आपल्या लौकिका प्रमाणेच हा संघ कामगिरी करले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यादृष्टीने खेळांडूनी आपला सराव देखील सुरु नियमित ठेवला आहे.
या यशस्वी खेळाडूंचे जी. एच.
रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकडेमिक डीन प्रा.
डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी,
क्रीडा समन्वयक प्रा.संदीप पाटील, क्रीडाशिक्षक सागर सोनवणे व आशा पाटील यांनी अभिनंदन
केले.
Comments
Post a Comment