जी. एच. रायसोनी महाविद्यालयात "अकाउंटींग म्युझियम ऑफ इंडिया" स्थापन
महाविद्यालयातील ४४ फुटी वॉलवर उलगडणार अकाउंटन्सीचा प्रवास ; वैदिक काळापासून ते आतापर्यंतचा लेखाजोखा
जळगाव,
ता.
२ : हिशोबाच्या पुस्तकांचे जग हे अनोखे आहे. ही पद्धत वैदिक काळापासून प्रचलित
आहे. अकाउंटींगशी जुड्नार्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आणि
त्यांना त्यातील इतिहास व बदलांची जाणीव करून देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच
"अकाउंटींग म्युझियम ऑफ इंडिया" जळगाव शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी
महाविद्यालयात उभारले गेले असून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या
संयुक्त विद्यमाने सोमवार २ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता या म्युझियमचे उद्घाटन
झाले. या म्युझियममध्ये वैदिक काळ, मुघल काळ,
ब्रिटीश
राजवट आणि आजच्या काळातील लेखाजोखा वेगवेगळ्या छायाचित्रांच्या माध्यमातून
प्रदर्शित करण्यात आला आहे.
या उद्घाटन
कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, या संग्रहालयाला
केवळ विध्यार्थीच नव्हे तर शहरातील रहिवासीही भेट देऊ शकतात. अकाउंटींगबद्दल
जागरूकता निर्माण करण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालय व इन्स्टिट्यूट ऑफ
चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत
असून या म्युझियममध्ये वैदिक काळातील लेखाजोखा ते सध्याचे स्वरूप वेगवेगळ्या
छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे. या छायाचित्रातील
फ्रेममध्ये पूर्वी आर्थिक उलाढाल कशी व्हायची याचे चित्रण आहे. दगडांवर आकार कोरून
पूर्वीचे काम कसे केले जात होते आणि कालांतराने ते कसे बदलत गेले हे संग्रहालयातील
फ्रेम्सवर वेगवेगळ्या विषयांनुसार चित्रण करण्यात आले आहे. पहिला विषय हिस्ट्री ऑफ
अकाउंटन्सीचा आहे, जो अकाउंटन्सीचा जन्म कसा झाला हे सांगते.
त्यासाठी मनुस्मृती, उपनिषदे, रामायण काळ आणि
अगदी कुराणाचाही उल्लेख केला आहे. त्या काळात मानव जेथे राहतो तेथे व्यापार,
व्यवसाय
आणि व्यवस्थापनासाठी आर्थिक पद्धतीचा वापर कसा केला जातो. त्याचप्रमाणे
नाण्यांपूर्वी व्यवसाय कसा केला जात होता हे सांगणारे अकाउंटिंगची माहिती यात आहे
तसेच तिसऱ्या फ्रेममध्ये भारतीय हेरिटेज अकाउंटन्सी, चौथ्या
फ्रेममध्ये फर्स्ट कॉइन ऑफ वर्ल्ड अँड इंडिया, पाचव्या
फ्रेममध्ये इस्लामिक कुराणमधील हिशेब, इस्लामिक
काळातील व्यवहाराच्या पद्धती, जकात इत्यादींची
माहिती देण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली सल्तनत आणि मुघल काळही वेगवेगळ्या
फ्रेम्समध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोर्तुगाल आणि इंग्रजांच्या
काळातील व्यवस्थाही येथे प्रदर्शित करण्यात आली असल्याची माहिती संचालिका प्रा.
डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.
यानंतर “इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया” जळगाव शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक कोठारी यांनी म्हटले कि, विद्यार्थ्यांसाठी हे संग्रहालय खूप फायदेशीर ठरेल. या संग्रालयात भारतातील चार्टर्ड अकाउंटंट्सचा इतिहास एका चौकटीत सांगितला आहे. एका फ्रेममध्ये कॅल्क्युलेटरचा विकास वर्षानुवर्षे कसा झाला आहे हे दाखवते याशिवाय या संग्रहालयात अकाउंटिंगशी संबंधित अनेक रंजक माहिती ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. या उद्घाटन कार्यक्रमात रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील, आयसीएआय जळगाव शाखेच्या सीए ममता रजनी, सीए विक्की बिर्ला, सीए सोहन नेहते, सीए अंकित राठी, सीए पिंकी केडिया, सीए अभिषेक कोठारी, प्रा. विशाल राणा, प्रा. कविता पाटील, प्रा. डॉली मंधान, प्रा. प्राची जैन, प्रा. प्रतिक्षा जैन, प्रा. आरती लुल्ला यासहीत सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले
“आयसीएआय”सोबत रायसोनी महाविध्यालयाचा करारनविन राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणानुसार समृद्ध प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे ज्ञान विविध
अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इंडियन नॉलेज
सिस्टीम’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण मिळावे
आणि या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा प्रमुख
उद्देश समोर ठेवून “इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया”
(आयसीएआय)
सोबत करार करण्यात आला. हा करार जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.
डॉ. प्रिती अग्रवाल व आयसीएआयच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक कोठारी तसेच
सिए असोसिएशन जळगाव ब्रांच यांच्या प्रमुख उपस्थित व स्वाक्षरीने करारावर
शिक्कामोर्तब करण्यात आला. यात “आयसीएआय”
हे
महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी ३६ तासांचा 'ट्रेन,
अर्न
अँड लर्न' (TEL) हा उपक्रम राबविणार असून यात जीएसटी,
आयटीआर
कसे फाईल करायचे यासहीत सिए क्षेत्रातील मुलभूत शिक्षण देवून विध्यार्थ्यांना
प्रमाणपत्र प्रदान करणार असून यानंतर हा कोर्स झालेल्या विध्यार्थ्यांना आयसीएआय
हे इटर्नच्या माध्यमातून रोजगाराची तसेच उद्योगाची संधी निर्माण करून देणार आहे.
Comments
Post a Comment