जगाच्या विकासकार्यात अभियंत्यांचे मोठे योगदान : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा ; टॉय मेकिंग स्पर्धेचे आयोजन

जळगावता. १९ : तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाल्याने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र क्रांती होत असून अभियांत्रिकी आणि डिजिटल टेक च्या प्रगतीमुळे भारत लवकरच महासत्तेकडे आगेकूच करत आहे. विकसित भारताचे स्वप्न अभियंत्यांनी केलेल्या नवनवीन संशोधनामुळेच शक्य होणार आहे तसेच उद्योजकता व स्टार्टअप वाढीसाठी चालना देणे गरजेचे असल्याचे मत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियंता दिन या कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केला. प्रसिद्ध अभियंते व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या अनुषगाने ता. १५ रोजी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अ‍ॅकडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावतसंगणकशास्त्रविज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटीलमॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख मुकुंद पाटीलसिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख शंतनू पवारइलेक्ट्रोनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटीलप्रा. जितेंद्र वडद्कर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मुकुंद पाटील यांनी केले. त्यात त्यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती दिली यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमात अ‍ॅकडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील बदल व आयटीतील प्रगतीमुळे झपाट्याने बदल होत असून अभियंत्यांमुळे आता देश ओळखला जात आहे. अभियांत्रिकीत विविध विषयांची संख्या वाढली आहे. आगामी काळात गुणवत्ताप्रधान व पर्यावरणाचा समतोल राखणारे बदल अभियांत्रिकीत अपेक्षित आहे. तसेच नॅनोटेक्नॉलॉजीचे क्षेत्र झपाट्याने वाढणार असून नवीन बदलांमध्ये भविष्यात मेकॅट्रॉनिक्सनॅनो टेक्नॉलॉजीला महत्त्व असेल. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीजचे महत्त्व वाढेल. आयटीमुळे अभियांत्रिकी क्षेत्राला सर्वाधिक बदल घडवता आले. आणि पुढे ही जबाबदारी वाढणार आहे. मल्टिटास्किंगवर अधिक भर द्यावा लागेल असे त्यांनी नमूद केले. यावेळी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांसाठी टॉय मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यात विविध विभागातील विध्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, सुवर्णा सराफ व प्रा. वसीम पटेल यांनी साधले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश