Posts

Showing posts from May, 2022

रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जैवविविधता सप्ताहाचा समारोप

Image
जळगाव , ता.२६ : येथील जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण , जलदौड रॅली , पोस्टर सादरीकरन स्पर्धा, जैवविविधतेचे संवर्धन या सहित विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरवर्षी , 22 मे रोजी जैवविविधतेच्या समस्यांबद्दल जागरूकता आणि संकल्पना समजून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या दिवसाचे उद्दिष्ट जगभरातील लोकांना जैविक विविधतेचे महत्त्व आणि त्याचा पृथ्वीच्या परिसंस्थांवर कसा परिणाम होतो याची आठवण करून देणे हा आहे. या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी सांगितले कि , जैवविविधतेने समृद्ध , शाश्वत आणि आर्थिक क्रियाकलापांसाठी संधी देणारे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. जैवविविधतेच्या कमतरतेमुळे पूर , दुष्काळ , वादळ अशा नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिकच वाढतो , त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर लाखो अद्वितीय जैविक प्रजातींच्या अने...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबईच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला भेट

Image
या अभ्यासदौऱ्यात विध्यार्थ्यानी जाणून घेतली नॅशनल स्टॉक एक्सचेंज सेंटरच्या कामकाजाची माहिती ; विध्यार्थ्यांचा उत्साहने सहभाग  जळगाव , ता. २० : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा मुंबई येथील भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंज असलेल्या ( NSE) म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. मुंबई येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील एमबीए शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन केले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. या बाबी विद्यार्थ्यांना समजाव्यात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजची उत्पादने, इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड उत्पादने, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, कर्ज बाजार, NSE ट्रेडिंग वेळ, प्री-ओपन सत्र, नियमित ट्रेडिंग सत्र, सत्र बंद, डील सेशन ब्लॉक करणे, सहयोगी / संलग्न कंपन्या, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि., नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्ह...

रायसोनी महाविध्यालयाच्या विध्यार्थ्यानीं दृष्टिहीनांसाठी बनवली 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक'

Image
मार्गात काही अडथळे आल्यास सतर्क करणार ; संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक   जळगाव , ता. २१ : क्षणभर डोळे मिटून चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चाचपडायला होते. आपण कुठे पडणार तर नाही ना , अशी भीतीही वाटते. परंतु ज्यांच्या आयुष्यात निसर्गानेच अंधकार दिला आहे , अशा व्यक्तींसाठी काठीच प्रकाश असते. ही काठी अंधांसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विध्यार्थ्यानी तीन हजारांत अनोखी स्मार्ट ब्लाइंड स्टिक तयार केली आहे. ही काठी रस्त्यावरून चालताना सेन्सॉरच्या मदतीने काठीवर बसवलेल्या कंपन मशीनला संदेश देते व स्टिक कंपन म्हणजेच व्हायब्रेट करू लागते. भविष्यात अंधांसाठी ही स्टिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अंध व्यक्ती लाल-पांढऱ्या रंगाची काठी घेऊन चालतात. त्यांना रस्त्यावरून चालताना पत्ता कसा शोधावा , आपण योग्य रस्त्याने जात आहोत की नाही , रस्त्यात काही अडथळा , खड्डा तर नाही ना , अशी समस्या अनेकदा भेडसावते. ही बाब लक्षात घेऊन रायसोनी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या ...

रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जैन फूडपार्कला अभ्यासदौरा

Image
या औद्योगीक दौऱ्यात विध्यार्थ्यानी जाणून घेतली फूडपार्क सेंटरच्या कामकाजाची माहिती ; विध्यार्थ्यांचा उत्साहने सहभाग  जळगाव ,  ता. २० : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा जळगाव शहरालगत असलेल्या जैन इरिगेशन अंतर्गत फूडपार्क येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी रायसोनी अभियांत्रिकीचे अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांच्या सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन केले होते. महाविद्यालयाचा या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते याचा परिचय झाला पाहिजे तसेच या अभ्यास दौऱ्यातील काही मुद्धे विध्यार्थ्याना केमिस्ट्री विषयात उपयोगी पडतील व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल तसेच कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल कशा पद्धतीने तयार केला जातो. त्याची साठवणूक ,  हिशोब पद्धती ,  वितरण पद्धती या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्य...

आकाश कवेत घेण्याची जिद्द असेल तर संशोधन क्षेत्रात नव्या संधीची कवाडं नेहमीच उघडी : प्रा. सोनल थोरवे

Image
रायसोनी महाविध्यालयात अंतराळ क्षेत्रातल्या करिअरसंधीवर मार्गदर्शन ; विध्यार्थ्यानी केले दुर्बिणीतून आकाशदर्शन जळगाव , ता. १७ : अंतराळात जाणं , या क्षेत्रात करिअर करणं , ग्रह ताऱ्यांचा वेध घेणं , एअरक्राफ्ट किंवा स्पेसक्राफ्ट बनवणं हे सारे सामान्य माणसाच्या कुतुहलाचे विषय असतातच , मात्र या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणं , त्यात करिअर करणं हा विचार मनात आला कि अनेक विध्यार्थी विचार करतात की , हे मला जमणार नाही तसेच हा विषय माझ्या बुद्धीमत्तेच्या कक्षेतच नाही. मात्र असा विचार न करता आपल्या क्षमता ओळखून , आपली कष्ट करण्याची तयारी , आपल्याला या विषयात असलेली रुची आणि कल समजून घेऊन जर योग्य माहिती मिळवली , तर आता या नव्या जगातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आपण योग्य माहिती मिळवून त्या दिशेनं योग्य प्रयत्न करणं मात्र अपेक्षित आहे असे मत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात “ करिअर ऑपरट्यूनिटी फॉर इंजिनिअर इन अॅस्ट्रॉनॉमी अँन्ड अॅस्ट्रोफिजिक्स ” या विषयावर आयोजित कार्यशाळेत पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था येथे कार्यरत असलेल्या प्रा. सोनल थोरवे यांनी व्यक्त के...

मातोश्री वृद्धाश्रमात रायसोनीच्या विध्यार्थ्यानी केल्या ‘गप्पा, गोष्टी आणि बरंच काही’

Image
सीएसआर अंतर्गत रायसोनी महाविद्यालयाच्या “ रोटरॅक्ट क्लब रायसोनी इलाईट ” तर्फे वृद्धाश्रमात आनंदसोहळा जळगाव , ता.१४ :   कुणी खेळत होते , कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते , कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत हा आनंद सोहळा रंगला होता शहरापासून काही अंतरावर सावखेडा या नयनरम्य परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात. तेथील सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्याचे कारंजे फुलवले जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या युवकांनी. आजी-आजोबांना बागडायला लावून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची ‘ रायसोनी ’ च्या शिलेदारांची ही काही पहिली वेळ नव्हती. मागील काळात या युवकानी मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला उडान या संस्थेत मतीमंद मुलांसोबत ‘ गप्पा , गोष्टी आणि बरंच काही ’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. एरव्ही सुटी म्हटले , की पिक्चरला जाणे , हॉटेलात जाऊन पोटपूजा करून धमाल करणे हा कॉलेजकुमारांचा आवडता छंद ; पण रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचा   “ रोटरॅक्ट क्लब रायसोनी इलाईट ” वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंद देण्या...

सकारात्मक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा ; डॉ. प्रणव चरखा

Image
रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा ; विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन जळगाव , ता. ११ : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे , त्यामुळे स्वताच्या दैनदिन कामकाजासोबतच समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात वापर करण्याची गरज आहे असा संदेश रायसोनी अभियांत्रिकेचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी आज ता. ११ बुधवार रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे ओचीत्य साधून रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात विध्यार्थ्यांना मार्गदर्शक करतांना दिला. महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सील विभागाच्या वतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त डिझाईन अॅन्ड थिंकीग या विषयावर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच सेक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम व कोल्ड कॉम्युटिंग टेक्नॉलॉजी या विषयावर यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात पुढे बोलतांना अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी नमूद केले कि , काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचव...

बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष : प्रा. सोनल तिवारी

Image
नीट व जेईई परीक्षा नियोजन महत्त्वाचे  ;  रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाची पालक सभा संपन्न जळगाव ,  ता. ७ :  येथील जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात इ.११वी विज्ञानमधून १२वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालक व विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दलची माहिती विध्यार्थी व पालकांना दिली. याप्रसंगी सुरुवातीला सरस्वती मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.  सभेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. तसेच प्रा. सोनल तिवारी यांनी आपल्या मनोगतात पुढे नमूद केले कि ,  प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेतील जीवन अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार ,  शिक्षा देण्याचे काम पालक व शिक्षकांचे असते या अनुषंगाने पालक सभेत विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करता यावा या उद्देशाने पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बारावीत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या पद्ध...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात "एंड्राइड ओएस" वर कार्यशाळा

Image
आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन जळगाव , ता.५ : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागाच्यावतीने “ एंड्राइड ओएस ” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत  मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा परिचय , मोबाईल उद्योगात एंड्राइड ची भूमिका , एंड्राइड एसडीके आणि सेटअपचा परिचय , ऍप्लिकेशन फ्रेमवर्क तयार करणे , वापरकर्ता इंटरफेस डिझाइन करणे , संसाधने , मेनू , सामग्री प्रदाते , संवाद , सूचना यासह विकसित ऍप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये प्रकाशित करणे या विविध विषयावर एंड्राइड ओएस या विषयातील संशोधनकर्ते सय्यद हाफीज चौधरी यांनी तृतीय वर्षातील विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागप्रमुख प्रा. रफिक शेख व प्रा. कल्याणी नेवे यांनी समन्वयकाची जबाबदारी पार पाडली तर  प्रा. रुपाली ढाके , प्रा. करिश्मा काळे , प्रा. विनोद महाजन , प्रा. फातिमा चुनावाला यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी , संचालि...

रायसोनी महाविद्यालयात रंगला “फॅशन शो” व “पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट”

Image
विद्यार्थ्यांचा भन्नाट रॅम्पवॉक ; मराठमोळ्या व वेगवेगळ्या थीमवर वस्त्र परिधान करून विध्यार्थ्यानी जिंकली रसिकांची मने जळगाव , ता. ४ : येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात सर्व विभागांच्या अंतर्गत “ फॅशन शो तसेच पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट २०२२ ”   या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाश्चिमात्य देशातील आणि भारतातील आजच्या काळाला अनुसरून विध्यार्थ्यानी फॅशन शो मध्ये वेगवेगळ्या थीमवर वस्त्र परिधान करून रसिकांची मने जिंकली. यामध्ये इंडो वेस्टर्न , वेस्टर्न , रेनबो थीम , पारंपारिक , बॉलीवूड , पुष्पा टाॅलीवूड इत्यादी विविध पद्धतीच्या ड्रेसमधील विध्यार्थ्यानी प्रदर्शन करून मनोवेधक सादरीकरण केले. तसेच पर्सनॅलिटी कॉन्स्टेंटमध्ये परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाची स्पर्धकांनी अचूक उत्तरे देत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत आपल्यात असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण देखील यावेळी स्पर्धेत केले. रसिक विध्यार्थ्यानी या “ फॅशन शो ” ला भरभरून प्रतिसाद देत आनंद लुटला. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात ...