आकाश कवेत घेण्याची जिद्द असेल तर संशोधन क्षेत्रात नव्या संधीची कवाडं नेहमीच उघडी : प्रा. सोनल थोरवे

रायसोनी महाविध्यालयात अंतराळ क्षेत्रातल्या करिअरसंधीवर मार्गदर्शन ; विध्यार्थ्यानी केले दुर्बिणीतून आकाशदर्शन


जळगाव, ता. १७ : अंतराळात जाणं, या क्षेत्रात करिअर करणं, ग्रह ताऱ्यांचा वेध घेणं, एअरक्राफ्ट किंवा स्पेसक्राफ्ट बनवणं हे सारे सामान्य माणसाच्या कुतुहलाचे विषय असतातच, मात्र या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणं, त्यात करिअर करणं हा विचार मनात आला कि अनेक विध्यार्थी विचार करतात की, हे मला जमणार नाही तसेच हा विषय माझ्या बुद्धीमत्तेच्या कक्षेतच नाही. मात्र असा विचार न करता आपल्या क्षमता ओळखून, आपली कष्ट करण्याची तयारी, आपल्याला या विषयात असलेली रुची आणि कल समजून घेऊन जर योग्य माहिती मिळवली, तर आता या नव्या जगातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. आपण योग्य माहिती मिळवून त्या दिशेनं योग्य प्रयत्न करणं मात्र अपेक्षित आहे असे मत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात करिअर ऑपरट्यूनिटी फॉर इंजिनिअर इन अॅस्ट्रॉनॉमी अँन्ड अॅस्ट्रोफिजिक्सया विषयावर आयोजित कार्यशाळेत पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था येथे कार्यरत असलेल्या प्रा. सोनल थोरवे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर रायसोनी अभियांत्रिकीचे अॅकडमीक डीन प्रा.डॉ.प्रणव चरखा तसेच प्रमुख वक्ते म्हणून इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स येथील संशोधक तुषार पुरोहित व टेक्नीकल असिस्टंट महेंद्र माटे हे उपस्थित होते. प्रा.डॉ.प्रणव चरखा यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत नमूद केले की, आपण छोट्या शहरात राहतो अमुक माध्यमात शिकलो असे गंड मनात न ठेवता योग्य माहिती, योग्य दिशा आणि खरोखरच आपल्यात असलेल्या क्षमता ओळखून वाटचाल करत राहिली पाहिजे व त्या दृष्टीने या क्षेत्रातली करिअरची आणि शिक्षण, अभ्यासक्रम यांचीही माहिती करून घेतली पाहिजे तसेच अंतराळ व त्यासंबंधी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना नासाची शिष्यवृत्ती मिळवून देण्यास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रा. डॉ. चरखा यांनी सांगितले. अमेरीकेतील नासा ही अंतराळ संस्था जगविख्यात असून अंतराळातील नासाच्या विविध मोहिमांबाबत तसेच आपल्या भवितव्यामध्ये अंतराळवीर किंवा शास्त्रज्ञ म्हणून करिअरची निवड याबाबत तुषार पुरोहित यांनी सखोल मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावे, करिअर निवड, दुर्बिणीतून आकाशदर्शन या विविध विषयासंबंधी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. प्रश्नोत्तराच्या तासात विद्यार्थ्यांनाही उस्फूर्त प्रतिसाद नोंदवत पुरोहित यांना अंतराळ व करिअरबाबत अनेक प्रश्न विचारले. आजच्या वैज्ञानिक व हायटेक युगात करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असताना अंतराळसंशोधन व त्यासंबधी क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यशाळेच्या अंतिम सत्रात मार्ग्दर्षाकानी आणलेल्या आधुनिक अंतराळ दुर्बिणीतून उपस्थित विध्यार्थानी आकाशदर्शन केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले तर आभार प्रथमवर्षाचे विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढद्कर यानी मांडले. तसेच कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश