रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात "एंड्राइड ओएस" वर कार्यशाळा
आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन
जळगाव, ता.५ : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागाच्यावतीने “एंड्राइड ओएस” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा परिचय, मोबाईल उद्योगात एंड्राइड ची भूमिका, एंड्राइड एसडीके आणि सेटअपचा परिचय, ऍप्लिकेशन फ्रेमवर्क तयार करणे, वापरकर्ता इंटरफेस डिझाइन करणे, संसाधने, मेनू, सामग्री प्रदाते, संवाद, सूचना यासह विकसित ऍप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये प्रकाशित करणे या विविध विषयावर एंड्राइड ओएस या विषयातील संशोधनकर्ते सय्यद हाफीज चौधरी यांनी तृतीय वर्षातील विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागप्रमुख प्रा. रफिक शेख व प्रा. कल्याणी नेवे यांनी समन्वयकाची जबाबदारी पार पाडली तर प्रा. रुपाली ढाके, प्रा. करिश्मा काळे, प्रा. विनोद महाजन, प्रा. फातिमा चुनावाला यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकीचे डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा, प्रा. डॉ. मकरंद वाठ यांनी कौतुक केले.

Comments
Post a Comment