रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबईच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला भेट
या अभ्यासदौऱ्यात विध्यार्थ्यानी जाणून घेतली नॅशनल स्टॉक एक्सचेंज सेंटरच्या कामकाजाची माहिती; विध्यार्थ्यांचा उत्साहने सहभाग
जळगाव, ता. २० : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा मुंबई येथील भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंज असलेल्या (NSE) म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. मुंबई येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील एमबीए शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन केले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. या बाबी विद्यार्थ्यांना समजाव्यात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजची उत्पादने, इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड उत्पादने, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, कर्ज बाजार, NSE ट्रेडिंग वेळ, प्री-ओपन सत्र, नियमित ट्रेडिंग सत्र, सत्र बंद, डील सेशन ब्लॉक करणे, सहयोगी / संलग्न कंपन्या, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि., नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड, पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंगचे फायदे या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते
भारतातील किंबहुना जगातील स्टॉक एक्सचेंज क्षेत्रातील बळकटीकरणासाठी
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मुंबईच्या
नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला
प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी रायसोनी
बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली. येथील मुख्यालयातील
पूर्व शहा व अनिल जवाहरने या फायनान्स ट्रेनर व मार्गदर्शकांनी विध्यार्थ्यांना
माहिती दिली कि, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ
इंडिया लिमिटेड हे देशातील आघाडीचे वित्तीय एक्सचेंज आहे. ज्यांचे मुख्यालय मुंबईत
आहे. हे 1992 मध्ये समाविष्ट केले गेले आणि तेव्हापासून देशभरातील गुंतवणूकदारांना
व्यापार सुविधा देणारी प्रगत, स्वयंचलित, इलेक्ट्रॉनिक प्रणाली म्हणून विकसित झाली
आहे. 2015 मध्ये या एक्सेंज सिस्टिमने त्यांच्या ट्रेंडिंग व्हॅाल्युमच्या मॅट्रिक
नुसार जगात चौथ्या स्थानावर स्थान मिळवले
देशाच्या भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारच्या
आदेशानुसार या स्टॉक एक्सचेंजने 1994 मध्ये आपले कामकाज सुरू केले. आघाडीच्या
वित्तीय संस्थांच्या असेंबली द्वारे आणि फेरवानी समितीने तयार केलेल्या शिफारशीनुसार
स्थापन केलेल्या या स्टॉक एक्स्चेंजमध्ये जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या
विविध शेअर होल्डिंग मालमत्तेचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुविधा सुरु करणारे हे देशातील पहिले स्टॉक एक्सचेंज होते, त्यामुळे देशभरातील गुंतवणूकदारांना एकाच बेसमध्ये एकत्र करणे सुलभ झाले. 2018 पर्यंत NSE चे एकून बाजार भांडवल यु एस २.२५ ट्रीलीयन पेक्षा जास्त होते. ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजच्या यादीत अकराव्या स्थानावर होते तथापि युएसएच्या विपरीत, जेथे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यापार देशाचा जीडीपीमध्ये सुमारे 70 टक्के आहे भारतातील या क्षेत्राचा वाटा ऐकून जीडीपीमध्ये फक्त 12 ते 14 टक्के आहे. या संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रापैकी सुमारे सात हजार आठशे कंपन्या सूचीबद्ध आहेत ज्यात सुमारे चार हजार भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये व्यापार करतात. अशा प्रकारे देशाच्या एकूण जीडीपीमध्ये स्टॉक एक्सचेज ट्रेडिंगचा वाटा केवळ चार टक्के आहे. भारतातील या स्टॉक एक्सचेंजद्वारे ट्रेंडिंग इलेक्ट्रॉनिक लिमीट ऑर्डर बुक द्वारे केले जाते तेथे ऑर्डर मॅचींग ट्रेनिंग कॉम्प्युटरद्वारे होते या संपूर्ण प्रक्रियेत विशेषज्ञ किंवा बाजार निर्मात्यांच्या हस्तक्षेप नसतात आणि ती पूर्णपणे ऑर्डरद्वारे चालवली जाते याचा अर्थ असा की जेव्हा गुंतवणूकदार मार्केट ऑर्डर करतात तेव्हा ते आपोआप मर्यादेच्या ऑर्डरशी जुळते. अशा प्रकारे या बाजारात विक्रेते आणि खरेदीदारांना अज्ञात राहण्याचा फायदा आहे. या व्यतिरिक्त ऑर्डर चलीत बाजार व्यापार प्रणालीमध्ये प्रत्येक खरेदी आणि विक्री ऑर्डर प्रदर्शित करून गुंतवणूकदारांना अधिक पारदर्शकता प्रधान करते NSE मधील हे ऑर्डर ब्रोकर्स द्वारे दिले जातात जे ग्राहकांना ऑनलाइन ट्रेडिंगची सुविधा देतात काही संस्थात्मक गुंतवणूकदार देखील “डायरेक्ट मार्केट एक्सेसच्या” या सुविधांचा लाभ घेऊ शकतात जेथे ते त्यांच्या ऑर्डर थेट ट्रेंडिंग सिस्टीममध्ये देऊ शकतात. स्टॉक एक्स्चेंजने जाहीर केलेल्या शनिवार रविवार आणि इतर सुट्ट्यांचा अपवाद वगळता ईक्टिविटी विभागातील NSE मार्केट ट्रेंडिंग संपूर्ण आठवडाभर चालते बाजाराची सुरु होण्याची वेळ नऊ वाजता तर बंद होण्याची नऊ वाजून आठ मिनिटाची असते असे त्यांनी सांगितले. सरतेशेवटी चर्चासत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली. रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने मॅनेजमेट विभागाचे अॅकडमीक डीन प्रा. डॉ. मकरंद वाठ, प्रा. योगिता पाटील, प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. डॉ. मोनाली शर्मा यांनी या अभ्यास दौऱ्याचे समन्वय साधले तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाचे विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित प्राध्यापकांनी आभार मानले. तसेच या अभ्यास दौऱ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment