बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष : प्रा. सोनल तिवारी

नीट व जेईई परीक्षा नियोजन महत्त्वाचे रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाची पालक सभा संपन्न

जळगावता. ७ :  येथील जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात इ.११वी विज्ञानमधून १२वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालक व विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दलची माहिती विध्यार्थी व पालकांना दिली. याप्रसंगी सुरुवातीला सरस्वती मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.  सभेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. तसेच प्रा. सोनल तिवारी यांनी आपल्या मनोगतात पुढे नमूद केले किप्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेतील जीवन अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कारशिक्षा देण्याचे काम पालक व शिक्षकांचे असते या अनुषंगाने पालक सभेत विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करता यावा या उद्देशाने पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बारावीत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या पद्धतीपेपर लिहिताना मांडावयाचे मुद्देवर्गातील नियमितताआपली जबाबदारी आदी बाबतचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षाप्रात्याक्षिकेप्रकल्पतोंडी परीक्षा यांचे नियोजन व पुढील अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना प्राचार्या सोनल तिवारी यांनी यावेळी विध्यार्थी व उपस्थित पालकांना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रगती पत्रकही संबंधित पालकांना पहावयास मिळाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुकेश सदानशिव तर आभार प्रा. शितल किंग यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी  प्रा. गुंजन चौधरीप्रा. गायत्री भोईटेप्रा. राहुल यादवअनिल सोनारसंतोष मिसाळ यांचे सहकार्य लाभले. तर या सभेत पालकांनीही मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदिवला होता. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश