रायसोनी महाविध्यालयाच्या विध्यार्थ्यानीं दृष्टिहीनांसाठी बनवली 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक'

मार्गात काही अडथळे आल्यास सतर्क करणार ; संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक

 

जळगाव, ता. २१ : क्षणभर डोळे मिटून चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चाचपडायला होते. आपण कुठे पडणार तर नाही ना, अशी भीतीही वाटते. परंतु ज्यांच्या आयुष्यात निसर्गानेच अंधकार दिला आहे, अशा व्यक्तींसाठी काठीच प्रकाश असते. ही काठी अंधांसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विध्यार्थ्यानी तीन हजारांत अनोखी स्मार्ट ब्लाइंड स्टिक तयार केली आहे. ही काठी रस्त्यावरून चालताना सेन्सॉरच्या मदतीने काठीवर बसवलेल्या कंपन मशीनला संदेश देते व स्टिक कंपन म्हणजेच व्हायब्रेट करू लागते. भविष्यात अंधांसाठी ही स्टिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अंध व्यक्ती लाल-पांढऱ्या रंगाची काठी घेऊन चालतात. त्यांना रस्त्यावरून चालताना पत्ता कसा शोधावा, आपण योग्य रस्त्याने जात आहोत की नाही, रस्त्यात काही अडथळा, खड्डा तर नाही ना, अशी समस्या अनेकदा भेडसावते. ही बाब लक्षात घेऊन रायसोनी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या लुणावत, शुभांगी पाटील व दुर्गेश तायडे या विद्यार्थ्यांनी स्मार्ट ब्लाइंड स्टिक तयार केली. या स्मार्ट स्टिकमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर, ऑर्डीनो बोर्ड, जंप वायर, बॅटरी, जीपीएस कंट्रोलर, ओन ऑफ स्वीच, वॅाटर कंट्रोलर, 9 व्हॅटची बॅटरी आणि मायक्रो कंट्रोलर बसवण्यात आले आहे. यामुळे 5 मीटरवरील अडथळ्याची माहिती कंपनातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेली ही स्टिक अतिशय उपयोगाची असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकीचे अॅकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी सांगितले.

 

नेत्रहीन व्यक्तीच्या मार्गातील अडथळे लगेच समजणार

अंधांसाठी बनवलेली ही स्मार्ट ब्लाइंड स्टिक समोरील, डावीकडील व उजवीकडील अडथळे ओळखू शकते. नेत्रहीन व्यक्ती चालताना समोर एखादी व्यक्ती, दगड, भिंत व विजेचा खांब, असा कोणताही अडथळा आल्यास लगेच नेत्रहीन व्यक्तीला कळते. काठी कोणत्याही दिशेला वळवली तरी तिथे अडथळा असल्यास त्वरीत व्हायब्रेट होते त्यामुळे नेत्रहीन व्यक्तीला मार्गातील अडथळा ओळखता येतो आणि तो पार करून पुढे जाता येते. भविष्यात यात आणखी बदल करून स्टिकवर जीपीएस व बझर बसवण्यात येणार आहे. यामुळे वेगवेगळ्या दिशांसाठी बझरचे वेगळे आवाज येतील, यामुळे अंधांना नियोजित स्थळी जाण्यासाठी मोठी मदत होईल.

 

अशी मिळाली प्रेरणा

यामागचा विशिष्ट हेतू सांगताना विध्यार्थी म्हणाले की, त्यांनी एकदा एका अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्या व्यक्तीला अपघात होण्याचीही भीती होती. त्यामुळे त्याला रस्ता ओलांडता आला नाही. अशा परिस्थितीत अंधांचे दु:ख पाहून विध्यार्थ्यानी असे उपकरण बनवण्याची योजना आखली जी अंधांचा स्मार्ट साथीदार बनून त्यांना मार्ग दाखवू शकेल. या अनुषगाने त्यांनी आपली भावना संगणक विभागातील प्रा. स्वाती पाटील, प्रा. हिरालाल सोळुंके, प्रा. शीतल जाधव, प्रा. प्रेम नारायण आर्या, प्रा. अंकुर पांडे, प्रा. मयंक नामदेव, प्रा. मोहित तौमर, प्रा.अयाज शेख यांना बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन टाकाऊ पाईपची स्टिक, लहान वायर, छोटा सेन्सरचा वापर करुन सेन्सर स्टिक तयार केली.

 

'स्मार्ट ब्लाइंड स्टिक' बनवण्यासाठी किरकोळ खर्च

ही स्मार्ट स्टिक बनवण्यासाठी तीन रुपये खर्च आला आहे याचे पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच भविष्यात दृष्टिहिनांसाठी यापेक्षा अधिक चांगला आणि कमी खर्चात 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक' तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश