सकारात्मक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा ; डॉ. प्रणव चरखा
रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा ; विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन
जळगाव, ता. ११
: आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, त्यामुळे स्वताच्या
दैनदिन कामकाजासोबतच समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी
तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात वापर करण्याची गरज आहे असा संदेश रायसोनी
अभियांत्रिकेचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी आज ता. ११ बुधवार रोजी
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे ओचीत्य साधून रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात
विध्यार्थ्यांना मार्गदर्शक करतांना दिला. महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन
कॉन्सील विभागाच्या वतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त डिझाईन अॅन्ड थिंकीग
या विषयावर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच सेक्युअर
ऑपरेटिंग सिस्टीम व कोल्ड कॉम्युटिंग टेक्नॉलॉजी या विषयावर यावेळी
विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात पुढे
बोलतांना अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी नमूद केले कि, काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले
आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व
विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि
ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या तंत्रज्ञानामुळे आपली
प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसत आहे. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा
होत्या त्या तंत्रज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण
मानले जाते. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.
स्वाती पाटील व प्रा. अंकुर पांडे हे होते तर या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन
केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा.
डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment