मातोश्री वृद्धाश्रमात रायसोनीच्या विध्यार्थ्यानी केल्या ‘गप्पा, गोष्टी आणि बरंच काही’

सीएसआर अंतर्गत रायसोनी महाविद्यालयाच्या रोटरॅक्ट क्लब रायसोनी इलाईटतर्फे वृद्धाश्रमात आनंदसोहळा

जळगाव, ता.१४ :  कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत हा आनंद सोहळा रंगला होता शहरापासून काही अंतरावर सावखेडा या नयनरम्य परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात. तेथील सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्याचे कारंजे फुलवले जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या युवकांनी.

आजी-आजोबांना बागडायला लावून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची रायसोनीच्या शिलेदारांची ही काही पहिली वेळ नव्हती. मागील काळात या युवकानी मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येला उडान या संस्थेत मतीमंद मुलांसोबत गप्पा, गोष्टी आणि बरंच काहीया उपक्रमाचे आयोजन केले होते.

एरव्ही सुटी म्हटले, की पिक्चरला जाणे, हॉटेलात जाऊन पोटपूजा करून धमाल करणे हा कॉलेजकुमारांचा आवडता छंद; पण रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचा  रोटरॅक्ट क्लब रायसोनी इलाईटवृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंद देण्यासाठी धडपडतोय. महाविध्यालयातील प्रा. श्रिया गौरव कोगटा आणि त्यांच्या विध्यार्थ्यानी स्थापन केलेल्या ह्या ग्रुपला एक दिवस वृद्धाश्रमाला भेट देण्याची कल्पना सुचली. सर्वांना ती आवडली. आणि त्यानुसार प्रा. श्रिया गौरव कोगटा यांचा वाढदिवस त्यासाठी निवडण्यात आला आणि नियोजन झाले. 

त्यानंतर या यंग ब्रिगेडचा दिवस सुरू झाला तो आजी-आजोबांसोबत, सर्वप्रथम त्यांनी सर्व ज्येष्ठांना हॉलमध्ये एकत्र केले आणि मनोरंजक खेळ सुरू केले. बादलीमध्ये चेंडू टाकणे, चिठ्ठीद्वारे चित्रपटातील डायलॉग व जुनी गाणी म्हणणे अशा स्पर्धांमध्ये तेथील वृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी साक्षी वाणी या विध्यार्थीनीने अनेक पारंपरिक व देशभक्तीपर गीते सादर करून वृद्धांना गाण्याच्या ठेक्यांवर नाचायला लावले तसेच यावेळी गौरव कोगटा याच्यातर्फे वृद्धाश्रमातील वृद्धाना काही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या उपक्रमात सहभागी युवकांनी त्यांच्यासोबत अल्पोहाराचा आनंद लुटला, रायसोनी महाविद्यालयाच्या “रोटरॅक्ट क्लब रायसोनी इलाईट”तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गप्पा गोष्टी आणि बरंच काहीया आनंदसोहळ्यात प्रा. योगिता पाटील, प्रा. मोनाली शर्मा, यश लढढां, लोकेश पारेख, संदेश तोतला, विवेक वाणी, तुलसी सोनी, ध्यानल बोरोले, दिशा काटकर, अंकिता गुप्ता, प्रगती नेवे, काजल बारी सहभागी झाले होते. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा, प्रा. डॉ. मकरंद वाठ, प्रा रफिक शेख यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश