रायसोनी महाविद्यालयात “इनोव्हेशन इन सायन्स”वर राष्ट्रीय परिषद संपन्न
संशोधक , स्कॉलर विध्यार्थी व उद्योजकानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग ; भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत पेपर सादर जळगाव , ता.३० : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेट विभागातर्फे “इनोव्हेशन इन सायन्स अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन” या विषयावर आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ता. ३० शुक्रवार रोजी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन व मराठवाडा अॅस्सेलिरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इक्युबेशन कॉन्सिल यांच्या सहकार्याने हि परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल-स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे प्रेसिडेंट व चंद्रा इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रोनीकसचे संचालक नारायण पवार , शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पराग पाटील , रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , रायसोनी अभियांत्रिकीचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा , रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. सौरभ गुप्ता व इस्टीट्युट इ...