रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटने नोंदविला १५१ कॉपीराइट्सचा विक्रम

जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या ओचीत्त्याने विक्रम विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव

जळगावता. २८ : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात पेटंट संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १५१ कॉपीराइट्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी दाखल केले. इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेसअॅकडमिकशैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टरलॅब मॅन्युअलकोर्स नोट्सपॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमोनोग्राफ आदी बाबींवर हे कॉपीराइट दाखल करण्यात आले आहेत. यावेळी मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी 'मानवाद्वारे साकारण्यात येणारे कोणत्याही स्वरूपाचे रचनात्मक कार्य म्हणजे बौद्धिक संपदा आहे. ही आपल्याला दैनंदिन जीवनात विविध स्वरूपात उपयोगास येत असते तसेच ती आधुनिक काळाची गरज आहे. पेटंटट्रेडमार्ककॉपीराइटट्रेड सिक्रेट याद्वारे आपण नवनिर्मिती व संशोधनास सुरक्षित करू शकतो. उद्योजक व व्यावसायिकांनी संशोधित तंत्रज्ञानडिझाईन व उत्पादनाचे पेटंट केल्यास त्यास कायदेशीर पाठबळ मिळून भविष्यातील आर्थिक व मानसिक त्रास टाळता येऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अभियांत्रिकीचे अॅकडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी यावेळी नमूद केले किमहाविद्यालये व विद्यापीठात अनेक संशोधने होत असताततसेच अभियंते-शास्त्रज्ञ प्रयोग करून नवीन निर्मिती करतात. ही बौद्धिक संपदा चोरली जाते किंवा तिची कॉपी केली जाते. परिणामी मूळ संशोधकाला त्याच लाभ होत नाही. त्यामुळे पेटंट मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरते. भारतीय पेटंटचे महत्त्वभारतातील पेटंट फाइल्सची वर्तमान स्थितीपेटंट हक्काचे आर्थिक महत्त्वभारतीय पेटंट संरक्षणाची जागतिक परिस्थितीभौगोलिक निर्दर्शन अशा विविध मुद्द्यांवर प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या १५१ कॉपीराइट्सचा विक्रमाबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनीसंचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश