मेकॅनिकल इंजिनीयरला करिअरच्या हजारो संधी : नीरज कलंत्री
रायसोनी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती
फोटो ओळ : कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री निरज कलंत्री व उपस्थित विध्यार्थी
जळगाव ता.२९ : मेकॅनिकल इंजिनीअिरगला
कधीही मरण नाहीच. आता या शाखेच्या जवळ जाणाऱ्या काही शाखा उदयास आलेल्या आहेत.
प्रोडक्शन इंजिनीअिरग आणि मेकेट्रॉनिक्स इंजिनीअिरग. मेकॅनिकलला अधिक वाव आहेच, पण प्रोडक्शन इंजिनीअिरगमध्येही
चांगल्या नोकऱ्या आहेत. मेकेट्रॉनिक्सचं क्षेत्र, तर आताच उदयाला येत असल्यामुळे त्यातही भविष्यात भरपूर संधी असतील.
मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये पदव्युत्तर पदवी (एम. ई. / एम.टेक.)घ्यायची असेल तर
डिझाइन, अॅजनालिसिस, मॅन्युफॅक्चिरग आणि एचव्हीएसी किंवा
थर्मल या क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येतं असे प्रतिपादन हैद्राबाद स्थित एका
बहुराष्ट्रीय कंपनीत सीनिअर मोडेलर म्हणून कार्यरत असलेले इंजि. नीरज कलंत्री
यांनी रोजी शहरातील सुपरिचित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयात केले. यावेळी
व्यासपीठावर रायसोनी अभियांत्रिकीचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख, डॉ. दीपेन कुमार रजक विभागप्रमुख हे
उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात पुढे बोलताना नीरज कलंत्री म्हणाले
कि, या क्षेत्रात स्वयंरोजगार, नोकरीच्या संधीही भरपूर आहेत. मोठय़ा
कंपन्यांना त्यांची उत्पादने तयार करताना लागणारे सुटे भाग तयार करून पुरवणे, लहान आणि मध्यम कंपन्यांकडे त्यांचा
स्वतचा देखभाल आणि दुरुस्ती विभाग नसतो. त्यामुळे अशा कंपन्यांना त्यांच्या
उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्रांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मदत करणारा स्वतचा
उद्योग सुरू करता येऊ शकतो. याशिवाय मेकॅनिकल इंजिनीअिरगमधल्या अनेक उपशाखांमध्ये
कन्सल्टन्सी अर्थात सल्लागारी करता येऊ शकते. कन्सल्टन्सी करताना तुम्हाला
बऱ्याचदा भांडवलाची गरज नसते. त्यामुळे तो उत्तम बिनभांडवली किंवा कमी भांडवलातला
उद्योग आहे. सध्या अॅसडिटिव्ह मॅन्युफॅक्चिरग ही नवी उपशाखा मेकॅनिकल
इंजिनीअिरगमध्ये उदयाला आली आहे. यात ३-डी पिट्रिंग अर्थात त्रिमिती छपाईचं नवं
तंत्रज्ञान आलं आहे. त्यामुळे या ३-डी पिट्रर्सचा वापर करता येऊ शकतो. या
क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करायला भरपूर वाव आहे. एखाद्या कारखान्याला
इंडस्ट्रिअल लेआउट म्हणजेच यंत्रे कशी उभारावीत, उत्पादन प्रक्रियेच्या क्रमानुसार विविध यंत्रांचा कारखान्यातला क्रम
आणि त्यांच्या जागा निश्चित करणे की, ज्याद्वारे
कमीतकमी वेळात आणि कमीतकमी मनुष्यबळात ते उत्पादन कसे तयार करता येऊ शकेल, याचा सल्ला त्यांनी विध्यार्थ्यांना
दिला. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन प्रा. अविनाश पांचाळ यांनी केले तर
महाविद्यालयाचे अकॅडेमिक डीन, डॉ.
प्रणव चरखा यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल आणि रायसोनी ग्रुप चे कार्यकारी संचालक मा.
प्रितम रायसोनी यांनी उपस्थितांचे कौतुक केले. तसेच कार्यशाळेचे यशस्वीरीत्या
आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment