रायसोनी महाविद्यालयात “इनोव्हेशन इन सायन्स”वर राष्ट्रीय परिषद संपन्न
संशोधक, स्कॉलर विध्यार्थी व उद्योजकानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग; भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत पेपर सादर
जळगाव, ता.३० :
येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील अभियांत्रिकी व मॅनेजमेट
विभागातर्फे “इनोव्हेशन इन सायन्स अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन” या विषयावर आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ता. ३०
शुक्रवार रोजी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात आयोजित करण्यात आली
होती. इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल
एज्युकेशन व मराठवाडा अॅस्सेलिरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इक्युबेशन कॉन्सिल यांच्या
सहकार्याने हि परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात
व्यासपीठावर मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल-स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे
प्रेसिडेंट व चंद्रा इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रोनीकसचे संचालक नारायण पवार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.
डॉ. पराग पाटील, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी
अभियांत्रिकीचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. सौरभ
गुप्ता व इस्टीट्युट इंडस्ट्री इटरॅक्शन विभागाच्या डीन प्रा.डॉ. ज्योती जाखेटे
उपस्थित होते. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांनी परिषदेच्या प्रास्ताविकेत नमूद केले कि, या
परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, अभियंते
आणि उद्योजक यांना एकत्र आणणे हे आहे, जे विविध
ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि परिषदेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची
देवाणघेवाण करतात. ही परिषद तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी सॉफ्ट कंप्युटिंग आणि
त्याच्या ऍप्लिकेशन्सच्या क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श
व्यासपीठ ठरणार आहे. NCISEM-2022, या बहुविद्याशाखीय संशोधन क्षेत्रात नवीनतम आणि
नाविन्यपूर्ण प्रगती आणि वास्तविक-जगातील अनुप्रयोग सादर करण्यासाठी आणि चर्चा
करण्यासाठी या राष्ट्रीय परिषदेचा संशोधक व विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार
आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन
ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा
समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील
बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन
व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत
करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर संचालक नारायण पवार यांनी आपल्या
मार्गदर्शन कार्यक्रमात नमूद केले कि आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम मधील गुंतवणूक आवश्यक आहे. सध्याला संशोधन आणि
विकास समावेशक असा समाज निर्माण करून शाश्वत विकासाला चालना आपण देऊ शकतो. तथापि, प्रभावी होण्यासाठी, पायाभूत सुविधांचा विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सार्वजनिक आणि खाजगी
दोन्हीचे पालनपोषण आणि प्रभावी धोरणांद्वारे नियमन करणे आवश्यक आहे तसेच त्यांनी
यावेळी इलेक्ट्रिकल व्हेईकलचे भविष्यात होणारे सकारात्मक परिणामाचाही संदर्भ दिला
व विध्यार्थ्यानी नेहमीच चांगले मित्र बनवावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी
उपस्थितांना दिला. यानंतर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.
पराग पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि, विज्ञानात
नवनवीन शोध लावणारा देश अधिक प्रगती करू शकतो, अशावेळी
विज्ञानासंबधीच्या परिषदा मधून होणाऱ्या ज्ञानाची देवाण-घेवाण महत्वाची ठरते, यातून जगात होत असलेल्या विविध संशोधनाची माहिती
मिळते. या संशोधनाचा फायदा दुर्बल घटकापर्यंत पोहचवा, असे आवाहन त्यांनी केले. “इनोव्हेशन इन सायन्स” या बाबत निगडीत अनेक बाबींवर चर्चा या परिषदेत
करण्यात आल्या. प्राध्यापक, उद्योगजगतातील
व्यक्ती तसेच संशोधक विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर्स
आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार
आहेत. विविध राज्यांमधून जवळपास २१० पेपर या राष्ट्रीय परिषदेत सादर झाले त्यातून
१५२ पेपरची निवड यावेळी करण्यात आली होती या परिषदेत नामांकित शिक्षण संस्थांमधील
प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी
मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. या परिषदेला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे
डॉ. आशिष विखार, किशोर अकोले, नितीन बागुल, अमोल
चौधरी, आशा चौधरी, गणेश
पालवे उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा. बिपासा पात्रा यांनी केले तर आभार
इस्टीट्युट इंडस्ट्री इटरॅक्शन विभागाच्या डीन प्रा.डॉ. ज्योती जाखेटे यांनी
मानले. सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक
श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment