रायसोनी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या पिस्तोल व रायफल शुटिंग संघात निवड


जळगाव, ता. ५ : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत क्रीडा विभागाकडून घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पिस्तोल व रायफल शुटिंग स्पर्धा मुळजी जेठा महाविद्यालयात घेण्यात आल्या व विद्यापीठाचा पिस्तोल-रायफल शुटिंगचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या दोन स्पर्धकांचा समावेश झाला आहे. यात रायफल शुटींग या प्रकारात देवेद्र चोपडे व पिस्तोल शुटींग यात राजरत्न गाडे यांची निवड आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या संघात करण्यात आली असून निवड झालेले खेळाडू दि. ०९ ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ, मेरठ (उत्तर प्रदेश) येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. निवड झालेल्या विध्यार्थ्यांना रायसोनी महाविद्यालयाचे क्रिडा संचालक संजय जाधव यांनी मार्गदर्शन केले असून खेळाडूंच्या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी गौरव करत विध्यार्थ्यांना त्याच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश