संभाजी राजे नाट्यगृहात उद्या रंगणार 'फॉरेवर लता’

रायसोनी इस्टीट्यूटतर्फे आयोजन ; कार्यक्रमाला असणार विनामुल्य प्रवेश



 

जळगाव, ता. १४ : लता मंगेशकरांनी तब्बल 70 वर्ष बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केलं. या सगळ्या गाण्यांमधून त्यांनी अत्यंत सुंदर क्षण दिले.या अनुषंगाने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ  रायसोनी इस्टीट्यूटने  फॉरेवर लताया भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उद्या शुक्रवार, ता. १५ रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातील संभाजी राजे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम रंगणार असून यामध्ये लता मंगेशकर यांच्या विविध चित्रपटातील  गाण्याचे सादरीकरण होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे अॅकेडमिक डीन प्रणव चरखा यांनी केले आहे.  

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश