रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव

“तरंग” कार्यक्रमात पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना विश्रांती देत विद्यार्थ्यांनी बजावली स्वयंसेवक म्हणून महत्वपूर्ण भूमिका

जळगाव, ता. ९ : जिल्हा पोलीस दलातर्फे “तरंग” या कार्यक्रमात रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पोलीस विभागाच्या मंगलम सभागृहात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.  पोलीस कल्याण विभागाच्या “तरंग” या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे पोलीस कवायत मैदानावर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या” या मालिकेतील कलाकारांनी विनोदी नाट्यकलेचे सादरीकरण करून उपस्थितांना लोटपोट करीत त्यांची दाद मिळवली होती. हा कार्यक्रम दूरचित्रवाणीवर लोकप्रिय असल्याने यावेळी मोठ्याप्रमाणात पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी पोलिसांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून कार्यक्रमाला सहकार्य करण्याची विनंती पोलीस विभागातर्फे करण्यात आली होती. याला दुजोरा देत महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी या कार्यक्रमात आयोजकांनी दिलेल्या विविध जबाबदारी चोख बजावत हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आपला महत्वपूर्ण वाटा उचलला. याच अनुषंगाने “तरंग” या कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी सदर विध्यार्थी व अयोजाकामध्ये समन्वय साधण्याचे काम रायसोनी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी श्री. बापूसाहेब पाटील यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक संदीप गावित, रायसोनी महाविद्यालयाचे अॅकडमिक डीन प्रणव चरखा संघपाल तायडे, अमित माळी व पंकज कासार हे उपस्थित होते. तसेच सहभागी विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश