राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन !

“ भारतीय शास्त्रज्ञां च्या योगदा ना”वर प्रकाश ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग जळगाव, ता. २८ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ' पोस्टर्स प्रेझेंटेशन स्पर्धा ' व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारतातील विज्ञानप्रेमींसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. याच दिवशी डॉ. सी. व्ही. रामन यांनी १९२८ साली केलेल्या महान शोधाची घोषणा केली होती , हा दिवस देशातील विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील योगदान साजरा करण्यासाठी समर्पित असून याच औचित्याने जी. एच. रायसोनी महाविध्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ' पोस्टर प्रेझेंटेशन ' या खुल्या स्पर्धेमध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यां...