राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन !
“भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदाना”वर प्रकाश ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारतातील विज्ञानप्रेमींसाठी एक
महत्त्वाचा दिवस आहे. २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला
जातो. याच दिवशी डॉ. सी. व्ही. रामन यांनी १९२८ साली केलेल्या महान शोधाची घोषणा
केली होती, हा दिवस देशातील
विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील योगदान साजरा करण्यासाठी समर्पित असून याच औचित्याने
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'पोस्टर
प्रेझेंटेशन' या खुल्या स्पर्धेमध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग
नोंदवला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना जी. एच. रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, ‘नव्या
संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवभारताची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.
सी. व्ही. रामन, होमी जे. भाभा, विश्वेश्वरय्या व्यंकटरमण, डॉ ए पी जे अब्दुल कलाम, राधाकृष्णन, एस चंद्रशेखर,
सत्येंद्र नाथ बोस, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या अनेक शास्त्रज्ञांचे योगदान
महत्वाचे आहे, ‘महाविद्यालयातील युवकांना नवी दिशा देण्यासाठी आणि युवाशक्तीचा राष्ट्राच्या
विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान युगातील नव्या प्रवाहाची
माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील भारतातील
विविध शास्त्रज्ञाच्या नवीन नवीन झालेल्या उत्क्रांतीतील पोस्टर बनवून त्याची सखोल
माहिती प्रदर्शित करुन विज्ञानाच्या बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला तसेच या स्पर्धेचा उद्देश
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, नवीन संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि विज्ञानाचा समाजाच्या
प्रगतीमध्ये असलेला महत्त्वाचा वाटा ओळखणे हा असून या “पोस्टर स्पर्धे”चे आयोजन नक्कीच उपयुक्त ठरेल. असे त्यांनी यावेळी म्हटले.
याप्रसंगी उत्कृष्ट पोस्टर व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम आयोजन व यशस्वी करण्याकरीता प्रा. डॉ. तुषार पाटील, प्रा. महेश भट, प्रा. प्रतिक चिरमाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment