जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना “एक्झिबिशन व्हेईकल”च्या माध्यमातून हवाई दलाचे दर्शन
अत्याधुनिक एरोस्पेस तंत्रज्ञान तसेच भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन
जळगाव, ता. २० : भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील
करिअरच्या संधी याविषयीचे मार्गदर्शन भारतीय हवाई दल प्राधिकरणाने “इंडक्शन
पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल” (आयपीईव्ही) च्या माध्यमातून जी. एच. रायसोनी कॉलेज
ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाले. देशभरात
भारतीय हवाई दलाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी पब्लिसिटी एक्झिबिशन
व्हेईकल नावाचा हा एक अनोखा मोबाइल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हवाई दलातील करिअर मार्गदर्शन (आयएएफ) या
विषयावर एक दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भारतीय हवाई दल
प्राधिकरणाने आयपीईव्ही ड्राईव्हची व्यवस्था देखील विद्यार्थ्यांसाठी केली होती.
उपक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, विध्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध विध्यार्थीभिमुख उपक्रम
राबवीत असते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यामातून विध्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाचा इतिहास व त्यातील करिअरच्या संधी याविषयी उपयुक्त असे
मार्गदर्शन मिळणार असून विध्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये या उपक्रमाचा नक्कीच
फायदा होईल तसेच नभः स्पृशं दीप्तम! या घोषवाक्यानुसार भारतीय हवाई दलाने
शतकानुशतके अद्वितीय कौशल्याचे दर्शन घडविले आहे. या जवानांनी देशाची सुरक्षितता
जपली आणि अनेक आपत्तींमध्ये उल्लेखनीय मानवी प्रेरणेचा अविष्कार देखील घडविले आहे.
या अनुषंगाने या बाबीचे सर्व विध्यार्थ्यानी स्मरण करत या उपक्रमात जास्तीत जास्त
संख्येने प्रत्यक्षरित्या सहभागी होऊन भारतीय हवाई दलातील करिअरच्या संधी जाणून घेत एक्झिबिशन व्हेईकल अनुभवावे व या संधीचे सोने
करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते विंग कमांडर आर.एस.
पाटील, आशिष चंदन, स्क्वाड्रन लीडर निकुंज पटेल, फ्लाइंग ऑफिसर अमित कुमार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, दहावी-बारावी व पदवी झाल्यावर भारतीय हवाई दलात जाण्यासाठी कोणत्या संधी
उपलब्ध आहेत. याशिवाय एव्हिएशन अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर भारतीय हवाई दलात
नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध होवू शकतात, तसेच इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकलमध्ये सुखोईचे
एअरक्राफ्ट सिम्युलेटर बसवलेले आहे. यामध्ये विमानाच्या सिम्युलेटर फ्लाइंगचा
अनुभव घेता येतो. तो प्रत्यक्षरित्या आम्ही विद्यार्थ्यांना देवू व यामध्ये
फायटर पायलटचा अद्यावत गणवेशही आहे तोही विध्यार्थ्यांना अनुभवता येईल असे त्यांनी
यावेळी सांगितले.
आयपीईव्ही ही तीन वाहनांची तुकडी होती ज्यात एक व्होल्वो बस आणि दोन हलकी वाहने होती. विंग कमांडर आर.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयएएफच्या १२ अधिकाऱ्यांचा या टीममध्ये समावेश होता तसेच या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी खास दिल्ली येथून ही आयपीईव्ही बोलविली होती. या उपक्रमाचे सूत्रसंचालन संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी केले. तर समन्वय मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील यांनी साधले तसेच अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. रफिक शेख यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले

.jpeg)


Comments
Post a Comment