जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनात “युवा जल्लोष”
८०० विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सादर ; विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांमुळे महाविद्यालय झाले बॉलीवूडमय
जळगाव, ता. २४ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड
मॅनेजमेंट महाविद्यालयात “अंतराग्नी-२०२५” या शीर्षकाखाली सुरु झालेल्या पाच
दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमात सुरुवातीला
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. श्रेयस रायसोनी व संचालिका प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल यांनी फीत कापून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. तसेच
विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल नमूद केले कि, महाविद्यालयीन
जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्त्व आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांच्या प्रतिभांसह कलागुणांना वाव मिळत असुन त्यांच्या सुप्त गुणांसह
मानसिक, बौद्धिक तथा शारीरिक विकास साध्य होतो. आजचे विद्यार्थी हे
देशाचे उज्वल भविष्य आहेत. शिक्षणासोबतच कलागुणांना वाव देणाऱ्या संधी मिळाल्यास
विद्यार्थी हे बौद्धिक, मानसिक व शारिरीकदृष्ट्या सुदृढ असतील तरच समाजाचा व देशाचा
आधारस्तंभ होतील. विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक
घड़विने हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. असे म्हणत त्यांनी या स्नेह
संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमाची माहिती दिली तसेच
विध्यार्थ्यांना यावेळी विविध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर
व्यासपीठावर उपस्थित अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी म्हटले कि, स्नेहसंमेलनाचा
प्रमुख हेतू विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना प्रोत्साहन देणे, भारतीय संस्कृतीची
ओळख करून देणे हा असतो. स्नेहसंमेलनात संस्कृती व ऐतिहासिक कार्यक्रमाची झलक सादर होत
असल्याने त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
विविध स्पर्धाचा निकाल
गीत गायन :- प्रथम : वैष्णवी
गोडेश्वर, द्वितीय : जीतेद्र अहिरे, तृतीय : सुरज खंडागळे
पर्सनालिटी कॉन्स्टेट :- मिस्टर अंतराग्नी (अभियांत्रिकी) : पवन महाजन, मिस अंतराग्नी
(अभियांत्रिकी) : रिया तळेले, मिस्टर अंतराग्नी (व्यवस्थापन) नकुल सोनावणे, मिस अंतराग्नी
(व्यवस्थापन) : पूनम बाविस्कर, बेस्ट स्माईल : निधी वाजपेयी, बेस्ट वॉक : स्वप्नील
श्रावणे, बेस्ट पर्सनालिटी : राज सोनवणे, बेस्ट ड्रेस : प्रतीक्षा चव्हाण,
नृत्य :- प्रथम : अक्षया
दानी, द्वितीय : अदिती बनसोडे, तृतीय : मनीषा मंडोकर
सांघिक नृत्य :- प्रथम : रिया भंगाळे
व पियुषा पाटील, द्वितीय : भूमी जाधवानी व ग्रुप, तृतीय : राज सोनवणे व श्रेयस
पाटील
डिपार्टमेंट वॉर :- प्रथम : बीसीए विभाग, द्वितीय : बीबीए विभाग, तृतीय : मेकॅनिकल
विभाग
कलर ब्लॉक डे :- प्रथम : राजेश्वरी
व ग्रुप, द्वितीय : भाविका घाटे व ग्रुप, तृतीय : टॉपजीक ग्रुप
साडी डे :- प्रथम : तन्मयी, द्वितीय
: तानिया व इशिका, तृतीय : कनिष्का व सात्विक दीक्षित
रेट्रो रिमिक्स :- प्रथम : स्वप्नील श्रावणे, द्वितीय : रिया तळेले, तृतीय : मुक्ताई
पाटील
कल्चरल डे :- प्रथम : नेहा
बडगुजर, द्वितीय : विराज सोनार व सुनीती, तृतीय : भाविका घाटे
हॉरर मँडनेस :- प्रथम : रिया
तळेले, द्वितीय : सोनल अलोने व ग्रुप, तृतीय : उत्कर्षा पाटील
ग्रुप डे :- प्रथम : पनीरी व
ग्रुप, द्वितीय : आनंद पाटील व ग्रुप, तृतीय : जतीन वाणी व ग्रुप
मिम डे :- प्रथम : समीर व
यशराज, द्वितीय : मयूर भंगाळे
मिस मँच डे :- प्रथम : ओम
पाटील, द्वितीय : संगणक अभियांत्रिकी विभाग
अंताक्षरी :- एमबीए व तृतीय
वर्ष एआय

.jpg)
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment