जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “कश्ती-२०२५” या विद्यापीठस्तरीय “मॅनेजमेंट फेस्ट”चे आयोजन

विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग ; नाविन्यता व उद्योजकतेवर विविध स्पर्धा संपन्न 

जळगाव, ता.१३ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयाचा विद्यापीठस्तरीय “कश्ती-२०२५” हा दोन दिवसीय मॅनेजमेंट युवा फेस्टिवल सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावर्षी “नाविन्यता व उद्योजकता” या विषयावरील विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापन प्रशाळेच्या संचालिका प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविकेत नमूद केले कि, जी. एच. रायसोनी सहित विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सुप्त कला गुंणांना वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून व नियमित शिक्षणासोबतच ३६० डिग्री डेव्हलपमेंट सहित कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून दरवर्षी “कश्ती” या युवा महोत्सवात विविध उद्योग संबंधित शार्क टॅक व बिजनेस प्लान सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच वर्षभर थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येते. यावेळी त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून देत विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शैक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच मॅनेजमेंट व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उपलब्ध संधीची माहिती देत स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मेजर-मायनर प्रोग्राम, एनईपी अँडिंग व्हॅल्यू, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु असल्याचे सांगत तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख अतिथी व विद्यापीठातील व्यवस्थापन प्रशाळेच्या संचालिका प्रा. डॉ. मधुलिका सोनवणे यांनी तरुणांना मिळणारे मॅनेजमेंट फेस्टिवल हे विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असे विचार मंच असून या विचार मंचातून अनेक संशोधक, उद्योजक तयार होत असतात, अन् ही संधी तुम्हाला सुद्धा आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी मेहनत घ्या. विद्यार्थ्याने स्व:शिस्त अंगीकारावी कारण तुमच्या यशस्वीतेमागे शिस्तबद्धता सर्वात महत्वाची आहे. भविष्यातील आव्हानांचा अंदाज घेत जो शिक्षणक्रम मनापासून आवडतो त्यातच आपले करिअर करा व केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार सुद्धा तितकाच मानसन्मान देणारा व अर्थप्राप्ती देणारा असतो याची सुद्धा जाणीव ठेवा असे भावनिक आवाहन करत महाविद्यालयाचे विद्यार्थी देश - विदेशातही कार्यरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

या दोन दिवसीय मॅनेजमेंट फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये रायसोनी शार्क टॅक, डिजिटल अॅड-मॅड शो, कल का नायक, बी-क़्विज, पोस्टर सादरीकरण, बोर्ड रूम बॅटल अशा विविध स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण करत प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातून २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयामध्ये सुरु असलेल्या विद्यापीठस्तरीय युवा महोत्सव “कश्ती-२०२५” या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बोर्डरूम बॅटल व पोस्टर सादरीकरण या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. यावेळी परीक्षक म्हणून अॅड-मॅड शो - हर्ष मतानी, कल का नायक - प्रा. अभिषेक सुरैया, शार्क टँक - श्री. सागर पाटील व श्री. अजिंक्य तोतला, बोर्डरूम बॅटल – प्रा. डॉ. योगिता पाटील व प्रा. डॉ.ज्योती जाखेटे, पोस्टर सादरीकरण – प्रा. देवदत्त गोखले, प्रा.कल्याणी नेवे व प्रा. रोहित साळुंखे, बी क्विझ - प्रा. डॉली मंधान, प्रा.प्राची जगवानी व प्रा.प्रतीक्षा जैन यांनी परीक्षण केले. तसेच विविध स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी प्रा. विशाल राणा, प्रा. मुकेश अहिरराव व प्रा. निखील ठाकूर प्रा. रोहित साळुंखे, प्रा. डॉ.मेघा निगम, प्रा. सरोज पाटील, प्रा. श्रिया कोगटा, प्रा.तन्मय भाले, प्रा. मुकेश अहिरराव, प्रा.कविता पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉली मंधान यांनी केले.

यांनी मिळवली विविध स्पर्धेत पारितोषिके

रायसोनी शार्क टँक स्पर्धेत प्रथम - कृष्णा चंद्रकांत पाटील, द्वितीय - प्राची नायसे, नकुल महाजन, कार्तिक केंचे, स्वप्नील श्रवण, तृतीय- अली जफर शेख, संचित रवींद्र जगताप, लक्ष्मी कोलते

अ‍ॅड मॅड शो स्पर्धेत सांघिक प्रथम – प्रसन्ना नीलेश भावसार, प्रशांत सुकलाल गव्हाळ, आदित्य विनोद बिरारी, प्रणाली सोनार, द्वितीय - वेदांत कैलास ढवळे, पूजा कैलास चौधरी, तृतीय - शिवम जाधव, निखिल महाजन, नकुल सोनवणे, अनुष्का बैसाणे, तनया सराफ

कल का नायक स्पर्धेत प्रथम – मानसी ललवाणी, पुनम बाविस्कर, द्वितीय  कल्याणी चौधरी, निकिता खेडकर, तृतीय- ऋषिका पाल्लीवाल, निमिषा अग्रवाल

पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम - खुशी सूर्यवंशी, ध्रुव काळुंखे, द्वितीय - दिव्या छाजेड, मनस्वी सैंदाणे, तृतीय- सुरंजना बग

बोर्ड रूम बॅटल स्पर्धेत प्रथम -  नवीन साहित्य, मेहक जयसिंघानी, जयंत बजाजद्वितीय - तनुश्री नाहाटा, निशा पाटील, जितेश राजपूत व तृतीय - सात्विक दीक्षित, इशान अहिरे, गंधर्व मधुकर पाटील

बी-क़्विज स्पर्धेत प्रथम – साईराज पाटील, आदित्य बाफना, ओजस जैन, दर्शन साळुंखे, द्वितीय  नवीन साहित्या, मेहेक जयसिंघानी, कार्तिक करमचंदानी, जीत मोतीरामानी व तृतीय – मोहित कोल्हे,चिन्मय पाताडे, अमोल सोनार, तन्मय ढाकणे

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश