शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला “थ्री.फाईव्ह” स्टार रेटिंग

उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जी. एच. रायसोनीला बहुमान प्राप्त महाविध्यालयावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव

जळगावता. ११ : शहरातील नामांकित स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाला केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत महाविद्यालयात वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे परीक्षण करून नुकतेच भारत सरकारने सलग तिसऱ्या वर्षी '३.५स्टार रेटिंगदेऊन सन्मानित केले.

दरवर्षी शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे भारतातील असंख्य महाविध्यालयामध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी हे रेटिंग दिले जाते. देशभरात ५,४५५ संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात '३.५मानांकन मिळविणारे रायसोनी महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

तंत्रशिक्षणात रायसोनी इन्स्टिट्यूट सतत नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख नेहमीच उंचावत असते. याचाच एक भाग म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत कार्यरत असणाऱ्या 'इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलया विभागाने रायसोनीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबविले. त्यात इंडस्ट्री ४.०स्टार्ट-अपइटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटडिझाईन थिंकिंगक्रिटीकल थिंकिंगपेटेंट फायलिंग यासारख्या आधुनिक विषयांची चर्चासत्रे व कार्यशाळा भरविण्यात आल्या होत्या. 'या सर्व उपक्रमांचे ‘ऑल इंडिया कॉन्सिल’च्या तज्ञ समितीने परीक्षण करून थ्री.फाईव्ह 'स्टार रेटिंग' देवून गौरविले. महाविद्यालयाच्या वार्षिक कामगिरीवरून हे रँकिंग ठरवले जाते. 

विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता व उद्योजकता या गुणांना चालना देण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे हे ३.५ स्टार रेटींग प्राप्त झाले असून जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या दिशादर्शक मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हे यश मिळाले आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात संपूर्ण भारतातून असंख्य महाविद्यालयांचा यात सहभाग होता. यापैकी महाराष्ट्रातून काही महाविद्यालयांना ३.५ स्टार रेटींग मिळाले असून उत्तर महाराष्ट्रातील जी. एच. रायसोनी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय या रेटिंगने सन्मानित करण्यात आले आहे. या यशामुळे शिक्षण क्षेत्रात रायसोनी इन्स्टिट्यूटची मान आणखी उंचावली असून जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया

संचालिका, प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी इस्टीट्युट, जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ हे सतत कार्यशील असून पुढील वर्षी पाचपैकी पाचही रेटिंग स्टार मिळवण्याचा आमच्या महाविद्यालयाचा मानस आहे. नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" हा पुरस्कार जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. महाविध्यालयाने आतापर्यतच्या आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व गाठले आणि इस्टीट्यूटची यशस्वी घौडदौड कायम राखत आपल्या सेवेचे पवित्र व्रत सुरु ठेवले. काळाच्या ओघात अनेक बदल स्वीकारत ही इस्टीट्यूट आजपावेतो अबाधित व कालांतराने चालणारी एक प्रगत शैक्षणिक चळवळ म्हणून नावारूपास आली असून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृत आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त स्वायत्त रायसोनी महाविद्यालय हे इनोव्हेशनच्या बाबतीत सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे. या कौन्सिल अंतर्गत गेल्या तीन वर्षात जवळपास १७० शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळांचे आयोजन केले आहे. आयपीआरअंतर्गत महाविद्यालयाने १८९ कॉपीराईट२४ पेटंट नोंद केले आहेत. महाविद्यालयाला सहा पेटंटतसेच १८९ कॉपीराईट प्राप्त झाले आहेत. अवघ्या चार तासांत १०१ कॉपीराईट नोंद करण्याची कामगिरी फॅकल्टीने केली आहे. बौद्धिक मालमत्ता अधिकारइनोव्हेशनस्टार्टअपउद्योजकता यावर महाविद्यालयात सातत्याने जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनआयबीएम नॅसकॉम हॅकेथॉनमंथन हॅकेथॉन आदी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. एनपीटीईएल स्वयमएनआयटीटी ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाचे सक्रिय सभासद असलेल्या रायसोनी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुवर्णरौप्य मानांकन पटकविले आहे, तसेच अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. मुकुंद पाटील व सर्व विभागप्रमुखांनी उत्कृष्ट कामगिरी करत विशेष समन्वय साधले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश