तंत्रज्ञान व नवनिर्मितीनेच देशाचा विकास शक्य : प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” वर आंत राष्ट्रीय परिषद संपन्न ; संशोधक , नवउद्योजक व स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता.२९ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २९ रोजी “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” या विषयावर आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयोर्क येथील ‘ मॉरिसविले ' येथे गेल्या २० वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत असलेले व फिनिक्स विद्यापीठातून बिजनेस मॅनेजमेंटची डॉक्टरेट तसेच सेंट जॉन फिशर कॉलेजमध्ये एमबीए फायनान्स तर सनी ब्रोकपोर्ट येथून इकॉनॉमिक्समध्ये बीएस केलेले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो यासहीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेटचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्ष तथा आयएनआयएफडी इन्स्टि...