जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन”वर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
संशोधक, स्कॉलर विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग; भारतातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिषदेत ९८ पेपर सादर
जळगाव, ता.२३ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट
महाविद्यालयात ता. २२ रोजी “डिजिटल
ट्रान्सफॉर्मेशन फॉर ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट” या विषयावर आंतराष्ट्रीय परिषदेचे
आयोजन करण्यात आले. या परिषदेत जळगाव येथील हिताची अस्टेमो इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. मनोज देशपांडे
व अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयोर्क येथील ‘मॉरिसविले' मधील महाविध्यालयात गेल्या २०
वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत असलेले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रा. क्रिस्टोफर
स्कॅल्झो हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक
करतांना जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी
नमूद केले कि, कोणत्याही देशाच्या प्रगतीत विज्ञान, तंत्रज्ञानाचे
मौलाचे योगदान असल्याचे अनेक देशाच्या वाटचालीवरून स्पष्ट झाले आहे,आणि याचाच
मागोवा घेत भारताने देखील डिजिटल परिवर्तन करत पायाभूत सुविधांचा विस्तार आणि लोकोपयोगी सुख
सुविधा निर्माण करायला सुरुवात केली आहे. यात क्लाउड सेवा आणि ई-गव्हर्नन्स प्रगत
करणे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मजबूत
करणे त्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्याप्रमाणात
परिवर्तन केले आहे तसेच भारताच्या डिजिटल प्रगतीचा विस्तार आरोग्यसेवा आणि
शिक्षणात झाला आहे. ई-संजीवनी (टेलीमेडिसिन), ई-हॉस्पिटल आणि ई-कोर्ट्स सारख्या
उपक्रमांमुळे आरोग्यसेवा आणि न्याय विभागात सुधारणा झाली आहे. डिजीलॉकरने तर असंख्य
वापरकर्त्यांसाठी डिजिटल दस्तऐवज पडताळणी
सुलभ झाली असून या
घडामोडींमुळे देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी आली आहे, ज्यामुळे सरकारी कामकाज आणि खाजगी
क्षेत्राच्या प्रगतीसाठी सेवांची सुलभता, आणि सुरक्षा वाढली आहे. राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण केंद्रस्थानी मानून या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे
देखील म्हटले.
यानंतर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या
संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं
युग आहे. माहिती तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मनुष्याचे जीवनमान पूर्णपणे बदलून
गेले आहे. दैनंदिन जीवनात पदोपदी आपण विज्ञान – तंत्रज्ञानाचा अनुभव घेतोय. “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन फॉर ऍडव्हान्स
मॅन्युफॅक्चरिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट” या प्रमुख विषयावर विचारमंथन
करण्यासाठी हि परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट स्कॉलर
विध्यार्थी, संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र आणणे हे आहे.जे या क्षेत्रात काम
करतात त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण या परिषदेत होईल. ही परिषद
तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन”
क्षेत्रातील
संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन
४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती भारताच्या अर्थ विकासाच्या केंद्र स्थानी आहे. ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग
तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच
जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा
समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे
यांचे अनेक उदाहरणे देत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती
दिली. तसेच विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव
कार्यतत्पर असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजना, डिजिटल इंडिया उपक्रम, क्लाउड-नेटिव्ह तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग,
इंटरनेट ऑफ थिंग्ज, 5G नेटवर्क, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डेटा गोपनीयता, डिजिटल
प्लॅटफॉर्म आणि इकोसिस्टम, डिजिटल परिवर्तन घडवून आणणारे सरकारी उपक्रम, डिजिटल
इंडिया अभियान, डिजिटल
ट्रान्सफॉर्मेशनमध्ये स्टार्टअप्सची भूमिका अश्या विविध मुद्यावर त्यांनी यावेळी
मार्गदर्शन केले.
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या
सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक
मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील संशोधक, नागरिक, प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थी
मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विविध राज्यांमधून जवळपास ९८ पेपरची निवड
यावेळी करण्यात आली. या राष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन संगणक अभियांत्रिकी
विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी केले तर आभार सिव्हील अभियांत्रिकी
विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवार यांनी
मानले तसेच या परिषेदेचे समन्वय मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ.
मुकुंद पाटील, इलेक्ट्रॉनिक
अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील व डेटा सायन्स-आर्टिफिशियल
इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील यांनी सहकार्य केले
तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे
अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment