तंत्रज्ञान व नवनिर्मितीनेच देशाचा विकास शक्य : प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपवर आंतराष्ट्रीय परिषद संपन्न संशोधकनवउद्योजक व स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग 

जळगावता.२९ : येथील  जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. २९ रोजी इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप” या विषयावर आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयोर्क येथील मॉरिसविले' येथे गेल्या २० वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत असलेले व फिनिक्स विद्यापीठातून बिजनेस मॅनेजमेंटची डॉक्टरेट तसेच सेंट जॉन फिशर कॉलेजमध्ये एमबीए फायनान्स तर सनी ब्रोकपोर्ट येथून इकॉनॉमिक्समध्ये बीएस केलेले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो यासहीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठातील स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेटचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्ष तथा आयएनआयएफडी इन्स्टिटयूटच्या संचालिका संगीता पाटील हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रायसोनी महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नप्रणरशिप” या प्रमुख विषयावर विचारमंथन करण्यासाठी हि चौथी परिषद आयोजित करण्यात आल्याचा अभिमान असून या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, नवउद्योजक, अभियंते व स्कॉलर विध्यार्थी यांना एकत्र आणणे हे आहेजे विविध ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि परिषदेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करतील तसेच प्रा. स्कॅल्झो यांचा अनेक वर्षातील अनुभव व अभ्यास विध्यार्थी आत्मसात करणार असून ही परिषद तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणर क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. मुळात इनोव्हेशन आणि टेक्नोलॉजी या एका नाण्याच्या दोन बाजू असून या दोघांच्या जोरावर आज पाचव्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आहे आणि त्यात एआय, मशीन लर्निग, ब्लॉगचेन टेक्नोलॉजीच्या या जगात इंटर्नप्रणरसाठी इनोव्हेशन टेक्नोलॉजी हे इंजिन सारखी काम करणार आहे त्यात टीम बिल्डींग, क्रिएटीव्हीटी, क्रिटीकल थिंकीग, प्रोब्लेम सोल्विंग अॅप्रोच, स्कील डेव्हलपमेट हे विविध स्कील विध्यार्थ्यानी आत्मसात केलेच पाहिजे, आणि हे “‘इनोव्हेशन टेक्नोलॉजी परिषद यासारख्या विविध इव्हेट्समधूनच शक्य होते. तसेच रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थी व प्राध्यापकांनी एकूण २०० कॉपीराइट्स व ८० पेटंट दाखल केल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती देत विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये परिषदेतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील उद्योजकव्यावसायिकप्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीने सभागृह मोठ्या संख्येने भरलेले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले तर आभार एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी मानले तसेच या परिषेदेचे समन्वय प्रा. डॉ. योगिता पाटील, डॉ. सरोज पाटील, डॉ. स्वाती पाटील, डॉ. मेघा निगम, डॉ. मुकेश अहिरराव, डॉ. मुकुंद पाटील, डॉ. तुषार पाटील, प्रा. डॉ. शंतनू पवार, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा.रफिक शेख, प्रा.प्राची जगवानी, प्रा.कल्याणी नेवे, प्रा.श्रिया कोगटा, प्रा तन्मय भाले,  प्रा. डॉली मंधान, प्रा.रोहित साळुंखे, प्रा.आरती लुल्ला, प्रा.कविता पाटील, प्रा. निखिल ठाकुर यांनी संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली साधले तर सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

 


उद्घाटन कार्यक्रमातील वक्त्यांचे मार्गदर्शन

आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळा , उज्ज्वल भविष्य ठरेल : प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा शब्द नसून हा अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगातील एक अत्यंत बलवान असा बदल आहे. म्हणजेच सुरवातीच्या आणि अलीकडच्या काळामध्ये जी म्हणून काही प्रगती आपल्याला दिसून येते, तो ठोस बदल म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स होय. वर्तमानकाळाला तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते. या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये सर्वात परवलीची संकल्पना कुठली असेल तर ती म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सध्या कुठल्याही क्षेत्रात वेगवान बदल कुठे घडत असतील तर ते देखील याच क्षेत्रात त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डिझाइन थिंकिंग हि कौशल्ये व्यवसायांना स्मार्ट, जलद निर्णय आणि उत्पादने घेण्यास अधिकाधिक मदत करीत आहे. ही कौशल्ये क्षेत्र-विशिष्ट नाहीत ते उत्पादन, आरोग्यसेवा, वित्त, IT, प्रवास, शिक्षण आणि अगदी तेल व वायू यासह विविध व्यवसायांसाठी लागू आहेत असे सांगत त्यांनी म्हटले कि स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये मोठी मजल मारली आहे. आता पुढच्या २५ वर्षांमध्ये भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षण यांची सांगड घालून हे प्रज्ञेचे शतक गाजवायला हवे.

 

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचेही मोठे योगदान: प्रा. संगीता पाटील

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी म्हटले कि, महिला या त्या तंत्रज्ञानाच्या फक्त ग्राहक नाहीत तर सध्याच्या आणि भविष्यातल्या डिजिटल विश्वाच्या त्या शिल्पकारही आहेत. तंत्रज्ञानाचा विकास हा लिंगभेदाच्या पलीकडचा असला पाहिजे यासाठी आतापर्यंतच्या मतप्रवाहांमध्ये सुधारणा करून काही प्रश्न उपस्थित करावे लागतील. तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुली आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हाती घेत असून आज विविध क्षेत्रात महिलांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर महिलांनी देखील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन अध्यक्षा संगीता पाटील यांनी करत त्यांच्या समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तसेच फॅशन इंडस्ट्रीत देखील त्या कार्यरत असल्याने यासहीत आजच्या स्थितीला सर्वच क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा समावेश झाल्याचे त्यांनी सांगितले.         

 

भारताची विज्ञान-तंत्रज्ञानात `परमप्रगती : प्रा. अनिल डोंगरे

विध्यापिठातील स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेटचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांनी इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिपवर सविस्तर मार्गदर्शन करतांना सांगितले किज्यांनी स्वतःला अपडेट केले त्यांना नवीन संधी मिळाल्या. त्यामुळे तंत्रज्ञान हे सतत बदलणार आहे. हे बदल स्वीकारण्यासाठी आपण सदैव तयार राहायला हवे. तंत्रज्ञान बदलानंतरच्या गरजा आपण शोधल्यास आपोआपच आपल्याला नवीन संधी सापडतील. एआयआणि रोबोटिक्सबाबत नेमके हेच होत आहे. नवे तंत्रज्ञान आल्यावर नवी कौशल्ये विकसित होतात, त्यातून नवे रोजगार उपलब्ध होतात. तसेच संशोधनाच्या बाबतीत आहे, संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात. परंतु आज पर्यंत गरिबी, आजार, युद्ध यावर बहुतेक संशोधन झाले पण त्यांच्यात फारसा बदल झालेला दिसत नाही. प्रत्येक संशोधनाला ठोस कारण असल्याने संशोधकाने नेहमी जगाच्या कल्याणासाठी संशोधन करायला हवे असे म्हणत विज्ञानाची धरून कास... नवनिर्मिती हा आमुचा ध्यास... तंत्रज्ञानाचा करुनी विकास... मानवी जीवन बनवू खास... असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश