जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अमेरिकास्थित प्रख्यात विध्यापिठातील प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो यांच्या मार्गदर्शनाखाली “३ आठवडे” कार्यशाळेचे आयोजन

१० ते ३० जानेवारी दरम्यान कार्यशाळा ; आंत्रप्रिनरशिप, स्टार्टिंग न्यू बिजनेस, टीचिंग मेथाडोलॉजी, केस-बेस्ड टीचिंग, सिम्युलेशन आदींवर सखोल अभ्यास

जळगाव, ता. १३ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय व फुलब्राइट स्पेशालिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १० ते ३० जानेवारी या कालखंडात अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयोर्क येथील मॉरिसविले' येथे गेल्या २० वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत असलेले व फिनिक्स विद्यापीठातून बिजनेस मॅनेजमेंटची डॉक्टरेट तसेच सेंट जॉन फिशर कॉलेजमध्ये एमबीए फायनान्स तर सनी ब्रोकपोर्ट येथून इकॉनॉमिक्समध्ये बीएस केलेले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रा. क्रिस्टोफर स्कॅल्झो यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  

या कार्यशाळेची पार्श्वभूमी नमूद करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, कार्यशाळेत अमेरिकेतील नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थामधील प्राध्यापक व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्याख्याते क्रिस्टोफर स्कॅल्झो हे मार्गदर्शन करणार असून या कार्यशाळेतील सहभागी विध्यार्थ्यांना अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयोर्क यांच्या सयुंक्त विद्यमाने ‘सर्टीफिकेट कोर्स इन बिजनेस प्लान तसेच ‘सर्टीफिकेट कोर्स इन आंत्रप्रिनरशिप इनोव्हेशन अँड क्रियेटीव्हीटी’ या सहभाग प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे या अनुषंगाने महाविद्यालयातील विध्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून भविष्यात या उपक्रमामुळे आंत्रप्रिनर, स्टार्टिंग न्यू बिजनेस आणि टीचिंग मेथाडोलॉजी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विध्यार्थी, प्राध्यापक, नवउद्योजक व संशोधकांसाठी नवी दालने खुली होतील हे निश्चित.

दि. १० जानेवारी पासून सुरु असलेल्या या कार्यशाळेत प्रा. स्कॅल्झो यांचा अनेक वर्षातील अनुभव व अभ्यास विध्यार्थी आत्मसात करतांना दिसत असून हि कार्यशाळा म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. तीन आठवडे निरंतर सुरु असणाऱ्या या कार्यशाळेत केस-बेस्ड टीचिंग, सिम्युलेशन यासोबतच उद्योजकीय कौशल्ये मजबूत करणे, अध्यापन पद्धती वाढवणे इत्यादी मुख्य विषयांना अनुसरून तंत्र शिकण्यात येत आहे तसेच भारतातील विध्यार्थी, प्राध्यापक, नवउद्योजक व संशोधकांच्या यशस्वी भविष्यासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय व स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयोर्क मॉरिसविले यांच्यातील प्रभावी भागीदारी मजबूत करणे हे या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्टे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी एमबीए विभागातील प्रा. डॉ. ज्योती जाखेटे हे मुख्य समन्वयक म्हणून काम पाहत आहे तर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, प्रा.तन्मय भाले, प्रा.रोहित साळुंखे, प्रा.विशाल राणा, प्रा.स्वाती पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे तर इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.    

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश