जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “७६ वा प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन ; विद्यार्थी, पालक व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
जळगाव ता. २६ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “७६” व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मोहित चंद्रशेखर सोनवणे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेला विध्यार्थी व त्याच्या पालकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की, विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्याला लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता, समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असा मौलिक संदेश संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी दिला. तसेच या दिनाचे महत्त्व सांगताना जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत म्हणाले की, संपूर्ण जगभरात सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. २६ जानेवारी या दिवशी सर्व भारतीय एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. स्वातंत्र्यानंतर जवळपास तीन वर्षांनी आपला देश सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, महिलाप्रधान, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला, याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमुळेच आज भारताची एकता टिकून आहे. या मूल्यांचा आदर करून प्रत्येक नागरिकांनी ती आत्मसात केली पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजास मानवंदना देत विविध देशभक्तीपर गीते सादर केली व अनुजा कुरकरे, हर्षदा पाटील तसेच सिमरन सचदेव या विध्यार्थीनिनी देखील आपली मनोगते यावेळी मांडली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसीम पटेल यांनी केले तर यावेळी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यासह महाविद्यालयातील विविध विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment