स्कूलच्या
क्रीडांगणावर भव्य स्वरूपात महोत्सव पार पडला ; विद्यार्थ्यांच्या
विविध गुणदर्शनाचे सादरीकरण
जळगाव, ता. २७ :
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. या
अनुषंगाने दरवर्षाप्रमाणे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शहरालगत असलेल्या सावखेडा
येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांसाठी “क्रीडा महोत्सवाचे” आयोजन केले. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा
अधिकारी रविंद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची
सुरुवात करण्यात आली. स्कूलचे क्रीडाशिक्षक सागर सोनावणे यांच्या वतीने सर्व
विद्यार्थी, पालक यांना
खेळाची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमातील विशेष म्हणजे अतिशय उत्साहात
विद्यार्थ्यांनी केलेल्या मार्चपास्टने सर्वांचे लक्ष आकर्षित केले. यावेळी विविध
खेळामध्ये सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी
रविंद्र नाईक म्हणाले कि, अशा क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून
उद्याचे उत्कृष्ठ खेळाडू घडण्यास मदत मिळते व या माध्यमातून एखाद्या
विद्यार्थ्यांला आपला खेळ सादर करण्याची संधी मिळावी हाच या आयोजनामागचा हेतू
असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर
मैदानावर विविध खेळ खेळा. निरोगी राहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यानंतर जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी, आपल्या लहान
मुलांबरोबर स्वतः पालकांनी त्यांच्या खेळांमध्ये सहभागी होऊन त्यांना खेळासाठी
प्रोत्साहित करावे असे नमूद केले. क्रीडा महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक
स्पर्धांमध्ये स्कूलच्या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गगन भरारी
घेतली. यावेळी सांघिक खेळ आणि मैदानी खेळ यातील अनेक स्पर्धा भरवण्यात आल्या यात
विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, बॅटमिंटन, कॅरम, चेस, टग ऑफ वार तसेच यामध्ये विविध अंतरांच्या धावण्याच्या
शर्यतींचा समावेश होता त्यात माँटेसरीच्या चिमुकल्यांनी देखील सहभाग घेतला. या
क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे व्यवस्थापक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर
सहकारी आदींसह पालक व
स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन
केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी
अभिनंदन केले.
Comments
Post a Comment