जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आर्यन पार्क येथे ‘फ्रेशर्स पार्टी’
जितेश आहुजा व राणी चौबे हे ठरले “ मिस्टर अॅन्ड मिस फ्रेशर ” जळगाव, ता. २९ : शहरालगत असलेल्या आर्यन पार्क रिसोर्ट येथे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीए व बीबीए विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेज लाइफमध्ये प्रवेश करताना विद्यार्थी काहीसे गोंधळलेले असतात. या मुलांना कॉलेजची तसंच सीनिअर्सची ओळख व्हावी यासाठी फ्रेशर्स पार्टीचं आयोजन केलं जातं. नवीन विद्यार्थ्यांना मनसोक्त मजा करण्याचं आणि त्यांत सीनिअर्सनीही या कार्यक्रमाच्या आयोजनात हातभार लावत आपल्या वाटची मजा करून घेण्याचं एकमेव निमित्त म्हणजे ही ' फ्रेशर्स पार्टी ' असते. या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आर्यन पार्क रिसोर्ट येथे ‘ फ्रेशर्स पार्टी ’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विध्यार्थ्यानी डीजेचा ठेका धरत व गेम्स, पेटपूजा आणि बरंच काही करत मिस्टर आणि मिस फ्रेशर या सगळ्यात प्रसिद्ध स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत एमबीए विभागातून जितेश आहुजा, राणी चौबे तसेच बीबीए विभाग...