विद्यापीठीय विविध स्पर्धामध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या तब्बल “१५” विध्यार्थी खेळाडूंची निवड

येणाऱ्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत करणार कबचौउमविचे प्रतिनिधित्व ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विध्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक

जळगाव, ता. ८  : मागील काही दिवसांमध्ये खानदेशातील विविध शहरांमध्ये पार पडलेल्या विद्यापीठ स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विध्यार्थी खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून नेत्रदीपक असे यश मिळवले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन श्रीमती जे. जे. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये रायसोनी महाविद्यालयाच्या बीसीए तृतीय वर्षाच्या पायल महेंद्र राणा व कांचन संजय शर्मा या विद्यार्थिनी खेळाडूंनी बुद्धिबळ खेळात उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय संघात स्थान मिळवले. त्यांनी शिरपूर येथे झालेल्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळवत पुढील स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण केली आहे. तसेच कबचौउम विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेचे आयोजन मु.जे. महाविद्यालय येथे करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये रायसोनी महाविद्यालयातील धनश्री जाधव, शुभम काळे, भारत चौधरी या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. 

यासहीत कबचौउम विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धा काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल,जळगाव येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये रायसोनी महाविद्यालयाच्या हॉलीबॉल संघातील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला, सदर संघातील चिरायू ज्ञानेश्वर बागुल व विवेक सोपान बनाइत या दोन खेळाडूंची विसरवाडी येथे होणाऱ्या आंतर विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. यासहीत कबचौउम विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन (मुलीं) बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रायसोनी महाविद्यालयाच्या बास्केटबॉल संघातील विद्यार्थिनींनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला संघातील तेजश्री पाटील, धनश्री पाटील, श्रद्धा जगताप, सुयेषा तडवी, खुशी सूर्यवंशी व मुलांमधून रिचर्ड पिंडो, आदित्य राजपूत, हंसराज पाटील या खेळाडूंची डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल येथे होणाऱ्या आंतर विभागीय संघात निवड करण्यात आली आहे.

या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते त्यांचा गौरव करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच निवड झालेल्या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सागर सोनावणे व आशा पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश