जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “मतदार जनजागृती” कार्यक्रम संपन्न
विधानसभा निवडणुकीसाठी विध्यार्थी व कर्मचाऱ्याकडून मतदानाचा संकल्प ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल याचे मार्गदर्शन
जळगाव, ता. १२ : आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच भाग म्हणून नुकतेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विध्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी म्हटले कि, २०२४ भारतीयांसाठी महत्त्वाचे वर्ष आहे ! या वर्षी आपण लोकशाहीचे सर्वात मोठे पर्व साजरे करणार आहोत. तुम्ही देखील सर्व या पर्वात आवर्जून सहभागी व्हा ! निवडणुकीत मत देणे हा केवळ आपला अधिकार नसून, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ! प्रत्येक मतदाराचे मत हे महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर
अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रजिस्टार अरुण पाटील व सर्व अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापन विभागाचे
विभागप्रमुख उपस्थित होते. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी आपल्या
प्रास्ताविकेत प्रत्येक विद्यार्थ्याने मतदानाचे कर्तव्य बजावावे यासाठी मतदार
जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन हे महाविद्यालयात करणे महत्वाचे असून प्रत्येक पाच
वर्षांनी आपल्याला लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला हक्क बजावण्याची संधी येते
त्यामुळे मतदान करून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद
केले. या नंतर जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी श्री. मदन रामनाथ लाठी
हे यावेळी उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, प्रत्येक नागरिकाला गेल्या पाच वर्षांचे
मूल्यमापन करण्याची आणि जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे मतदान करण्याची ही संधी आहे
त्यामुळे या संधीकडे पाठ फिरवणे योग्य ठरणार नाही प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य
बजावले पाहिजे आणि तसा संकल्प केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी उपस्थित
विद्यार्थ्यांना “वोटर हेल्पलाइन अॅप” बद्दल माहिती दिली तसेच
विद्यार्थी कल्याणी अधिकारी वसीम पटेल यांनी मतदार नोंदणी व मतदार जनजागृतीसाठी
जी. एच. रायसोनी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. या उपक्रमात
उपस्थित विध्यार्थी व कर्मचाऱ्याकडून भविष्यात येणार्या सर्व निवडणुकीसाठी मतदान
करण्याचा संकल्प येथे करण्यात आला. सदर उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल
रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment