जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा भव्य रोजगार मेळावा संपन्न !

आंतरराष्ट्रीय कंपनीत अभियांत्रिकी व एमसीएच्या २३० विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखती ; महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचा उपक्रम


 जळगाव, ता. २८ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे ईगलबाइट सोल्युशन्स प्रा.ली.या कंपनीमार्फत जी. एच. रायसोनी महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व निवडकर्ते म्हणून ईगलबाइट सोल्युशन्स प्रा.लीया कंपनीचे संचालक ओम काठे, सीनियर सेल्स मॅनेजर नम्रता जोशी, ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर उदय पाटील, सीनियर डिझायनर पल्लवी जाधव, जूनियर डेटा विश्लेषक लक्ष्मीछाया पाटील तसेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते.

यावेळी ३०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली तर २३० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या संकल्पनेतून रोजगार, समपुदेशन व मार्गदर्शन केंद्राची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयात असलेल्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सतत प्रयत्न करणे व विध्यार्थ्यानी व्यवसाय करावा यासाठी महाविद्यालयातील हे केंद्र कार्य करते असे सांगितले. सुरवातीला कंपनीचे संचालक श्री. ओम काठे यांनी मुलाखती व निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवून सांगत  विविध टप्यात उपस्थित विध्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती घेतल्या. ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. गिरीधारी तिवारी यांनी या उपक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रा. करिश्मा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्रा.विनित महाजन प्रा.कल्याणी नेवे, प्रा.पंकज रंगलानी, प्रा.तुषार वाघ, प्रा.मंगेश देवळे यांनी सहकार्य केले. सदर परिसर मुलाखतीत सहभागी विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले़.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश