जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी "बालदिन" उत्साहात साजरा

स्पर्धांमध्ये रमले चिमुकले विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

जळगाव, ता. १८ : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील “टोडलर टेल्स”मधील प्ले ग्रुप व नर्सरीचे विद्यार्थीही जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, बालगीत, वेशभूषा या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वप्रथम शिक्षकांद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व जी. एच. रायसोनी टोडलर टेल्सच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना आपल्या रोजच्या अभ्यासातून थोडी उसंत मिळावी म्हणून शिक्षकांनी विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले. या दरम्यान, इयत्ता पाचवीसाठी थ्रो बॉल, सहावीसाठी दोरी उडीइयत्ता सातवी व आठवीसाठी क्रिकेट आणि प्रश्नमंजुषा इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. तसेच या बालदिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांनी नृत्य सादरीकरणाने उपस्थित विध्यार्थ्यांचे मनोरंजन करत त्यांचा उत्साह द्विगुणीत केला तर कार्यक्रमाच्या शेवटाला सर्व विद्यार्थ्यांना प्रबोधन करणारे मनोरंजक चित्रपट दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शीतपेय आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षिका अल्फिया लेहरी यांनी मांडली तर सूत्रसंचालन शिक्षिका स्मिता भामरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले. 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश