“वुमन्स हेल्थ एंड री प्रॉडक्टिव्ह वेल बीइंग” यावर जी. एच. रायसोनी महाविद्यालयात मार्गदर्शन

महाविद्यालयातील पिंक हॅट्स क्लबव वुमन्स हेल्थ एंड लाइवलीहुड अलायंसचा उपक्रम ; डॉ. शुभम पिंगळे यांनी विद्यार्थिनीना दिले आरोग्य व सबलीकरणाचे धडे

जळगाव, ता. २१ : ‘‘सध्या बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, मोबाईल व इतर तंत्रज्ञानाचा अतिवापर, ताणतणाव यामुळे महाविद्यालयीन युवतींच्या लाइफस्टाइलवर नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवतींनी डॉक्टर व इतर मार्गदर्शकांकडून माहिती घेऊन आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ व समुपदेशन तज्ज्ञ डॉ. शुभम पिंगळे यांनी केले.

येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात विद्यार्थिनीसाठी काम करणाऱ्या पिंक हॅट्स क्लबव वुमन्स हेल्थ एंड लाइवलीहुड अलायंसच्या संयुक्त विध्यमाने वुमन्स हेल्थ एंड री प्रॉडक्टिव्ह वेल बीइंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ व समुपदेशन तज्ज्ञ डॉ. शुभम पिंगळे, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. तसेच कुटुंबातील आरोग्याशी निगडीत महत्वाची भूमिका पार पाडणारी व्यक्ती देखील आई म्हणून महिलाच असल्याने आज महिलांमध्ये महिला आरोग्यया विषयावर चर्चा होणे अत्यंत महत्वाचे असून आजचे प्रमुख वक्ते डॉ. शुभम पिंगळे यांचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. शुभम पिंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले कि,अलीकडे धकाधकीच्या जीवनामुळे महाविद्यालयीन युवतींचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे, जीवनशैलीत योग्य ते बदल करून मुलींनी आहार, विहार, निद्रा यांच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच नियमित व्यायाम देखील केले पाहिजे आरोग्य चांगले राहिले तरच जीवन यशस्वी होऊ शकते. हे लक्षात घेऊन मुलींनी खबरदारी घेणे गरजेचे असून सुदृढ आरोग्य हाच जीवणाचा भक्कम पाया असल्याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील यांनी तर आभार संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सोनल पाटील यांनी मानले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय पिंक हॅट्स क्लबच्या सहकारी प्राध्यापकांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश