जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय युवा परिषदेचा अभ्यासदौरा

तीन दिवसीय परिषदेत कल्चर ऑफ काइंडनेस, ग्लोबल इशू व पर्सनल डेव्हलपमेंटवर भर ; विध्यार्थ्यांचा उत्साहने सहभाग

जळगाव, ता. २७ : नुकतेच हैदराबाद येथे झालेल्या ग्लिम्प्सेस ऑफ़ राइजिंग विथ काइंडनेस या विषयावरील आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स विभागातील जवळपास 30 विद्यार्थी ३ प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.  शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता जी. एच. रायसोनी महाविध्यालय कायमच अग्रेसर असते. या अनुषंगाने हैदराबाद येथील कान्हा शांती वनम, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या जागतिक मुख्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थी सहभागी झाले.

या परिषदेच्या माध्यमातून कल्चर ऑफ काइंडनेस, ग्लोबल इशू व पर्सनल डेव्हलपमेंटवर अधिक मंथन करण्यात आले. तसेच वृंदा भट, किर्ती शेट्टी आणि ताना शाह याच्यात पॅनेल चर्चा झाली त्यांनी यावेळी कल्चर ऑफ काइंडनेसवर भाष्य करतांना नमूद केले कि, दयाळू असणे हा केवळ एक स्वभावाचा भाग नसून तुमचं डोकं शांत ठेवण्यासाठी तुमचा हा स्वभावगुण तुम्हाला मदत करतो. सोशल एंक्झायटी अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते. मानसिक आरोग्याचा थेट संबंध हा शारीरिक आरोग्यशी येत असतो अशा प्रकारची सोशल एंक्झायटीची समस्या आपल्या आयुष्य जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करते त्यामुळे कल्चर ऑफ काइंडनेसचा आधार घेवून मार्गक्रमण केल्यास नक्कीच त्याचा एक सकारात्मक फायदा होत असल्याचे म्हटले यानंतर समकालीन जागतिक घडामोडी : भारतासमोरील संधी, समस्या आणि आव्हाने या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करून भारताची ताकद, कमजोरी यावर लक्ष वेधून भारताला असणाऱ्या संधी, तसेच महासत्ता म्हणून भारताची असणारी वाटचाल, त्यात असणारे अडथळे यावर वृंदा भट यांनी प्रकाश टाकला. तसेच सशक्त भारत घडवण्यासाठी तरुणांचे व राज्यकर्त्यांच्या धोरणांचे मोठे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. किर्ती शेट्टी यांनी समकालीन घडामोडींच्या संदर्भात भारतापुढे असणाऱ्या समस्या व आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ताना शाह यांनी पर्सनल डेव्हलपमेंटवर उपस्थिताना मौलिक टिप्स दिले. या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. कल्याणी नेवे व  प्रा. रुपाली ढाके यांनी या अभ्यास दौऱ्याचे समन्वय साधले. तर या अभ्यास दौऱ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व अॅकडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश