Posts

Showing posts from January, 2024

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली “राष्ट्रपती भवन”ची भेट

Image
विद्यार्थ्यांनी अनुभवला देशाचा गौरवशाली इतिहास ; राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुलाला भेट जळगाव , ता. ३१ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती भवन येथे नुकतीच काढण्यात आली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्थळांना भेटी देऊन सहलीचा मनमुराद आनंद लुटला. या सहलीमध्ये राष्ट्रपती भवनाला तसेच निसर्गरस्म्य लोटस गार्डन , नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक , संसद भवनाच्या इमारती , इंडिया गेट , शहीदांच्या स्मरणार्थ बांधलेले युद्ध स्मारक , राजपथ , कुतुबमिनार व अखेरच्या टप्प्यात नैनितालला विध्यार्थ्यानी भेट दिली. यावेळी विध्यार्थ्यानी राष्ट्रपती भवन प्रांगणात असलेल्या राष्ट्रपती भवन संग्रहालयातील 7-डी थिएटरमध्ये , राष्ट्रपती भवनाशी संबंधित व्हिडिओ आणि चित्रे थिएटरच्या चहुबाजूंनी पाहिली तसेच पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ते विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी संबंधित माहिती मिळवली. मुख्याध्यापिका तेजल ओझा आणि शिक्षिका लीना त्रिपाटी, ममता शरण, सारिका शर्मा, अल्फिया लहरी, आरती पाटील व व्यवस...

जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटमध्ये कर्मचाऱ्यांचा “नीव” हा वार्षिक आनंदोत्सव दिमाखात साजरा

Image
रंगमंचावर रंगली कलामैफल ; अविस्मरणीय कार्यक्रमाने भारावले सहकारी रसिक   जळगाव , ता. २७ :  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयामध्ये सहका-यांसाठी एम्प्लॉई एनुअल स्पोर्ट अ‍ॅण्ड कल्चरल मिट म्हणजेच “ नीव ” हा वार्षिक आनंदोस्तव व क्रीडा सप्ताह जल्लोषात पार पडला. यावेळी नाटक , मिमिक्री , समूह गायन , समूह नृत्य , एकल नृत्य , व्यक्तिगत गायन , पारंपारिक वेशभूषा , बॉलिवूड थीम , फॅशन शो , काव्य वाचन , क्रिकेट , बुद्धिबळ , टेबल टेनिस , कॅरम , बॅटमिंटन , संगीत खुर्ची , रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इस्टीट्यूटमधील सहका-यांना कामातून मोकळीक मिळावी तसेच कामाचा ताण कमी व्हावा आणि आपल्यातील विविध कलागुणांना चालना मिळावी , त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा व नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी या उद्देशाने क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल चार दिवस जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी , बिजनेस मॅनेजमेंट , कनिष्ठ महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील ३०० सहकाऱ्यांनी विविध कला प्रकारात सहभागी होऊन आयुष्या...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “७५ वा प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा

Image
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन ; विद्यार्थी, पालक व प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती जळगाव ता. २६ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ओम कमलाकर चौधरी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले की , विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्याला लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांतता , समता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असा मौलिक संदेश संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिला. यावेळी रायसोनी इस...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील “कॉम्प्युटर ऍप्लिकेशन”च्या विद्यार्थ्यांचा नाशिकच्या सॉफ्टवेयर इंडस्ट्रीजला अभ्यासदौरा

Image
या औद्योगीक दौऱ्यात विध्यार्थ्यानी जाणून घेतली “ईएसडीएस” सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेडच्या कामकाजाची माहिती ; विध्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग जळगाव , ता. १९ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा नाशिक येथील “ ईएसडीएस ” सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड व “पर्याय फूड” येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील एमसीए व बीसीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , वेब डेव्हलपमेंट , कोडिंग , सॉफ्टवेअर बनवणे , क्लाउड कॉम्प्युटिंग , डेटाबेस व्यवस्थापित करणे , विश्लेषण प्रणाली आणि बऱ्याच काही बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते असे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्र...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगला “पतंग महोत्सव”

Image
कुकिंग विदाउट फायर, पतंग बनवा व रांगोळी यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन, पतंगावर विविध सकारात्मक स्लोगन्स लिहून समाज प्रबोधन जळगाव , ता. १५ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मॅनॅजमेट व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागातर्फे मकरसंक्रांतीच्या औचित्याने “ पतंग महोत्सवा ” चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पतंग महोत्सवामुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक पेहराव परिधान केला तसेच पतंगावर विविध सकारात्मक स्लोगन्स लिहून समाज प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमाचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व विविध विभागातील विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , पतंग महोत्सव सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि त्यातून समाज प्रबोधन कर...

भविष्यात बिजनेस टिकवायचा असेल तर इनोव्हेशन टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही : डॉ. संजय गोपाळ

Image
“ स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक ” निमित्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” वर राष्ट्रीय परिषद संपन्न ; संशोधक , नवउद्योजक व स्कॉलर विध्यार्थ्यानी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग   जळगाव , ता.१२ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. १२ रोजी “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुंबईतील व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील माजी सहयोगी अधिष्ठाता आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संजय मंगला गोपाळ , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे संचालक डॉ. राजेश जावळेकर , स्टार्टअप इंडिया व नवउद्योजकांचे मेंटोर निखिल कुलकर्णी तसेच विनले पॉलीमरचे संचालक प्रमोद संचेती हे परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती देखील परिषदेत साजरी करण्यात आली. परिषदेचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि , वाणिज्य ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात दोन दिवसीय “सायबर‎ सुरक्षा” समिट

Image
कार्यशाळेत मार्गदर्शकांचा एकवटला सूर ; संशोधक ,  प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती   जळगाव, ता. १० : डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल , असे प्रतिपादन बँगलोर येथील इंफॉर्मेशन शेअरिंग एंड एनालिसिस सेंटरचे संचालक जीपी कॅप्टन पी. ए. नायडू यांनी केले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे तसेच नॅशनल सायबर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया अॅन्ड सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १०   व ११ जानेवारी रोजी “ सायबर सिक्युरिटी समिट ” या शीर्षकाखाली दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या समिटच्या पहिल्या दिवशी कॅप्टन नायडू यांच्यासोबतच गोवा येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे डॉ. अजित मुजुमदार, हैदराबाद येथील सायबर सेक्युरिटी कन्सल्टंट प्रा. आशुतोष म्हैसकर व मुंबई येथील ट्रीज इन्फाचे संचालक मयुरेश भागवत या वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवात...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ता. १२ व १३ रोजी “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नप्रणरशिप”वर राष्ट्रीय परिषद

Image
जळगाव ,  ता. ९ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर ( MACIA), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३ री इंटरनॅशनल कॉन्फरन्स “ इनोव्हेशन टेक्नोलॉजी अॅन्ड इंटर्नप्रणरशिप ” या विषयावर आधारित , येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने ता. १२ व १३ जानेवारी रोजी   राष्ट्रीय   परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या   परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्यापक ,  रिसर्च स्कॉलर ,  विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनाही संशोधन सादर करता येणार असून आयोजित   परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात वक्ते प्रा.डॉ. जनार्दन पौडेल , काठमांडू नेपाळ येथील त्रिभुवन विद्यापीठचे निखिल कुलकर्णी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आयआयसीचे संचालक डॉ. राजेश जावळेकर, सहयोगी प्राध्यापक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रयोगशाळा भारत सरकारचे प्रमुख प्रा.डॉ. संजय मंगला गोपाळ तसेच   परिषदेच्या प्रमुख संयोजीका व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांची प्रम...